एक्स्प्लोर
नंबर न सांगताच रिचार्ज करा, व्होडाफोनची नवी सेवा
मुंबई : ग्राहकांच्या प्रायव्हसीसाठी व्होडाफोनने नवी सेवा सुरु केली आहे. ग्राहकांना आता आपला नंबर न सांगताच रिचार्ज करता येईल. अशा प्रकारची सेवा देणारी व्होडाफोन इंडिया पहिलीच दूरसंचार कंपनी ठरली आहे.
प्रायव्हेट रिचार्ज मोड म्हणजेच 'पीआरएम' असं या सेवेचं नाव आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या ही सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेनुसार ग्राहकांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन रिचार्ज करताना नंबर देण्याची गरज नाही.
पीआरएमचा वापर कसा कराल?
व्होडाफोनच्या या सेवेचा लाभ घेण्यासाठी पीआरएम मोडचा पर्याय निवडावा लागेल. यासाठी ग्राहकांना रिचार्ज करताना PRIVATE असं लिहून 12604 या क्रमांकावर मेसेज करावा लागेल. त्यानंतर वन टाईम पासवर्ड म्हणजे ओटीपी दिला जाईल. या ओटीपीवरच रिचार्ज होईल.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन रिचार्ज करताना नंबरऐवजी हा ओटीपी वापरता येईल. सध्या ही सेवा पश्चिम बंगाल सर्कलसाठीच सुरु करण्यात आली आहे. मात्र लवकरच देशभरात ही सेवा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement