एक्स्प्लोर
व्हिडीओकॉनचा 'क्युब 3' लॉन्च, 13MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फीचर्स

मुंबई : प्रसिद्ध भारतीय कंपनी व्हिडीओकॉनने महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन एक व्होल्ट टेक्नलॉजीवर आधारित 4 जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे. 'क्युब 3' असे या स्मार्टफोनचे नाव आहे. व्हिडीओकॉनने या स्मार्टफोनमध्ये पॅनिक बटन दिलं आहे. खरंतर सरकारनेच आता प्रत्येक स्मार्टफोनमध्ये पॅनिक बटन अनिवार्य केलं आहे. व्हिडीओकॉनच्या नव्या स्मार्टफोनची किंमत 8 हजार 490 रुपये एवढी आहे. व्हिडीओकॉन कंपनीच्या माहितीनुसार, पॅनिक बटन आता कंपनीच्या प्रत्येक फोनमध्ये बेसिक फीचर म्हणून अॅड करण्यात येणार आहे. मात्र, या फीचरसाठी एक खास अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. व्हिडीओकॉनचे फीचर्स : मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम 5 इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले (2.5 डी कव्हर्ड ग्लास, ड्रॅगनट्रेल एक्स प्रोटेक्शन) 1.3 गीगाहर्ट्झ क्वाड-कोर मीडियाटेत MT-6735 प्रोसेसर 3 जीबी रॅम 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा 3000 mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र






















