एक्स्प्लोर
सहा महिन्यांपासून बंद असलेले ट्विटर अकाउंट्स डिलीट होणार
अकाउंट्स बंद करण्याची प्रक्रिया एका दिवसांत नाहीतर काही महिन्यात ट्विटर पूर्ण करणार आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस साईन इन न केलेले अकाउटं असणाऱ्यांना ट्विटर एक मेल पाठवणार आहे. जर तरिही त्यांनी अकाउंट्स साईन इन केलं नाही तर ट्विटर ते अकाउंट्स बंद करणार आहे.
मुंबई : सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया साईटसोबतच मायक्रो ब्लॉगिंग साईट असणाऱ्या ट्विटरचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ट्विटर आपल्या ट्विपल्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असतं. अशातच ट्विटर बऱ्याच दिवसांपासून वापरात नसलेल्या अकाउंट होल्डर्सना ईमेल पाठवत आहे. त्यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून साईन इन न केलेले अकाउंट्स ट्विटर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय ट्विटरने घेतला आहे. त्याबाबतच माहिती देणारा मेल ट्विटरने ट्विपल्सला केला आहे. यामध्ये 11 डिसेंबरपर्यंत आपलं अकाउंट साइन इन करण्यासाठी ट्विपल्सना सांगितलं आहे. अन्यथा ते अकाउंट्स बंद करून त्या अकाउंटचं युजर नेम दुसऱ्या युजर्सना देण्यात येणार आहे.
द वर्जने एका रिपोर्टमध्ये ट्विटरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीबाबत सांगितले आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, 'युजर्सना उत्तम सेवा देण्यावर आमचा भर आहे. त्यानुसार, जे युजर्स अॅक्टिव्ह नाहीत त्यांचे अकाउंट्स बंद करण्यावर काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्सना अचूक विश्वासार्ह्य माहिती मिळेल आणि ट्विटरवरील त्यांचा विश्वास वाढेल. अनेक लोकांनी ट्विटरचा वापर करावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने ट्विटरकडून हे प्रयत्न करण्यात येत आहेत.'
ट्विटरने इनअॅक्टिवेट अकाउंट कधी बंद करणार याची तारिख अद्याप जाहिर केलेली नाही. अकाउंट्स बंद करण्याची प्रक्रिया एका दिवसांत नाहीतर काही महिन्यात ट्विटर पूर्ण करणार आहे. सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस साईन इन न केलेले अकाउटं असणाऱ्यांना ट्विटर एक मेल पाठवणार आहे. जर तरिही त्यांनी अकाउंट्स साईन इन केलं नाही तर ट्विटर ते अकाउंट्स बंद करणार आहे.
संबंधित बातम्या :
गुगल मॅपचं नवं फिचर; फिरताना 'लोकल गाइड' करणार मदत
व्हॉट्सअॅपच्या नको असलेल्या ग्रुपपासून सुटका हवी?; 'या' सेटिंग्स करा
आता गुगल योग्य उच्चार करायला शिकवणार; जाणून घ्या खास फिचर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement