Twitter Edit Button : एलन मस्क यांच्या ट्विटर पोलनंतर ट्विटरचं मिश्किल ट्वीट; म्हणालं, एडिट फिचरची चाचणी मागील एका वर्षापासून सुरु
Twitter Edit Button : टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ट्विटरचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 9.2 टक्के शेअर खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांची ट्विटरच्या संचालक मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे.
Twitter Edit Button : सध्या ट्विटर (Twitter) आणि एलन मस्क (Elon Musk) असे दोन विषय चर्चेत आहेत. त्याचं कारण म्हणजे टेस्लाचे (Tesla) सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ट्विटरचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 9.2 टक्के शेअर खरेदी केल्यानंतर एलन मस्क यांची ट्विटरच्या संचालक मंडळात नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, ट्विटरमधील मोठ्या गुंतवणुकीनंतर लगेचच एलन मस्क यांनी सूत्र हलवण्यास सुरुवात केल्याचं बोललं जातं आहे. मस्क यांनी मंगळवारी ट्विटर पोल घेत युजर्सा एडिट बटण हवंय का याबाबत विचारणा केली होती. या पोलला युजर्स चांगला प्रतिसादही देत आहेत.
दरम्यान, आता या एलन मस्क यांच्या ट्विटर पोलनंतर एडिट बटणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरने मस्क यांच्या पोलबाबत मिश्किल ट्विट केलं आहे. ट्विटरनं म्हटलंय की, आम्ही पोल घेण्याच्या आधीपासूनच एडिट बटणावर काम करतोय. ट्विटरने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'आता सगळेच विचारत आहेत म्हणून सांगतो. होय, आम्ही गेल्या वर्षीपासून एडिट बटणाच्या पर्यायावर काम करत आहोत. मात्र, ही कल्पना आम्हांला ट्विटर पोलमधून आलेली नाही. आम्ही आता लवकरच यांची चाचणी सुरू करणार आहोत. यामध्ये फिचर कसे काम करते, काय शक्य आहे, काय सुधारणा करण्यात येतील हे पुढील काही महिन्यांत कळेल.'
now that everyone is asking…
— Twitter Comms (@TwitterComms) April 5, 2022
yes, we’ve been working on an edit feature since last year!
no, we didn’t get the idea from a poll 😉
we're kicking off testing within @TwitterBlue Labs in the coming months to learn what works, what doesn’t, and what’s possible.
एलन मस्क यांनी मंगळवारी सकाळी आपल्या ट्वीटर हँडलवरुन ट्वीटमध्ये एडिट पर्याय हवा की नको, असा प्रश्न विचारुन युजर्सची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. एलन मस्क यांच्या या पोलला उत्तर देताना ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी युजर्सला सल्ला दिला होता की, एलन मस्क यांनी विचारलेला प्रश्न खूप महत्वाचा आहे, आपलं उत्तर काळजीपूर्वक निवडा. त्यांच्या या ट्वीटलाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता ट्विटरने पोल आणि एडिट पर्यायाबाबत मिश्लिक ट्वीट केलं आहे.
Do you want an edit button?
— Elon Musk (@elonmusk) April 5, 2022
महत्त्वाच्या बातम्या :
- Elon Musk : टेस्लाच्या एलन मस्कने ट्विटरमधील मोठ्या गुंतवणुकीनंतर पोल घेत विचारला प्रश्न, एडिट फिचरबाबत मांडा मत
- Viral Video : आरशात स्वत:चेच प्रतिबिंब पाहून घाबरला कुत्रा, पुढे असं काही केलं की...
- SECL Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी, जाणून घ्ये कुठे करता येणार अर्ज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha