एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्विटरकडून ‘बायसेक्शुअल’ हॅशटॅगवर बंदीनंतर नेटीझन्समध्ये गोंधळ
ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवरील एलजीबीटीक्यू गटाशी संबंधित शब्द उदाहरणार्थ ‘बायसेक्शुअल’सारख्या शब्दांना बंदी घातली. पण या बंदीमुळे ट्विटरवर चोहूबाजूंनी टीकेची झोड उठली.
सॅन फ्रान्सिस्को : ट्विटरने गेल्याच आठवड्यात आपल्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा गैरवापर कमी करण्यासाठी, आपल्या धोरणांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले होते. त्याअंतर्गत कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवरील एलजीबीटीक्यू गटाशी संबंधित शब्द उदाहरणार्थ ‘बायसेक्शुअल’सारख्या शब्दांना बंदी घातली. पण या बंदीमुळे ट्विटरवर चोहूबाजूंनी टीकेची झोड उठली.
‘द वर्ज’च्या वृत्तानुसार, आपल्या नव्या धोरणांची अंमलबजावणी करताना मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटने अॅडल्ट कंटेन्टच्या नियमांतर्गत ‘बायसेक्शुअल’ हॅशटॅगवर बंदी घातली. ट्विटरच्या नव्या धोरणांमधील हा महत्त्वाचा बदल होता.
याअंतर्गत आपमानास्पद वागणूक, स्वत:ला त्रास होईल अशी कृती, स्पॅम आणि त्याच्याशी संबंधित व्यवहार, ग्राफिक्स हिंसा आणि अॅडल्ट वस्तूंच्या प्रसारावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून हालचाली सुरु होत्या.
पण दुसरीकडे ‘बायसेक्शुअल’ हॅशटॅगला सेन्सर केल्याने सोशल मीडियात एकच गोंधळ उडाला, नेटीझन्सनी ट्विटरवर आपला रोष व्यक्त केला. यासंदर्भात एका यूजर्सने ट्वीट करुन म्हटलं की, “आता जर तुम्ही ‘बायसेक्शुअल’ सर्च करत असाल, तर त्यासंदर्भातील फोटो, बातम्यांवर क्लिल केल्यास त्यापुढे काहीही प्रतिसाद मिळणार नाही. ट्विटरची ही दुहेरी कात्री आहे. ज्याला त्यांनीच तयार केलं आहे. आपल्याला ट्विटर सोडलं पाहिजे”
यावर ट्विटरकडून संबंधित यूजर्सला ट्वीट करुन सांगण्यात आलं की, “आम्ही काही शब्दांना सर्च केल्यानंतर एरर येत असल्याचं समजलं आहे. आम्ही यासाठी माफी मागतो. पण आम्ही यावर लवकरच तोडगा काढू, आणि याची माहिती लवकरात लवकर तुम्हाला देऊ.”
दरम्यान, यापूर्वी ऑक्टोबरमध्ये ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोरसे यांनी “सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपले नवे नियम आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी अधिकाधिक आक्रमक धोरण आवलंबेल,” असं सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement