Amol Mitkari & Ajit Pawar: देवेंद्र फडणवीस पुन्हा केंद्रात जाण्याची चर्चा, अजित पवार मुख्यमंत्री होवोत, 'त्या' नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Amol Mitkari on Ajit Pawar CM: पुढच्या आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी करावी. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत हेच आमच्यासाठी विठ्ठलाचे राज्य.

Amol Mitkari on Ajit Pawar CM: कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली आहे. मात्र, येत्या आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी (Ajit Pawar) सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी, असं साकडं राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी यांनी विठ्ठलाला घातलंय. काल कार्तिकी एकादशीनिमित्त आमदार मिटकरी यांच्या अकोल्यातील आरोग्यनगर भागातील घरी भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होताय. याच भजनाच्या कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) "विठ्ठलाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी" हा संत नामदेवांचा अभंग गायलाय. याचाच धागा पकडत अमोल मिटकरी यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हेच आमच्यासाठी विठ्ठलाचं राज्य असल्याचे सांगितले. आपल्या प्रार्थनेला विठ्ठल नक्कीच पावेल, असा विश्वासही आमदार मिटकरींनी व्यक्त केलाय. आमचा नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर असावा, ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा असल्याचं ते म्हणाले. ते रविवारी अकोल्यात 'एबीपी माझा'शी बोलत होते. (Maharashtra Politics News)
दरम्यान, 2029 पर्यंत राज्यातच थांबणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नुकतेच म्हणाले होतेय. मात्र, अजितदादा मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात मोठ्या पदावर जावं, अशा शुभेच्छाही आमदार मिटकरी यांनी यावेळी फडणवीसांना दिल्यात. राज्यात महायुतीत सध्या मुख्यमंत्री पदाची कोणतीही चर्चा नसतांना अमोल मिटकरी यांच्या हे वक्तव्य आलंय. या वक्तव्याने महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहेय.
माझ्या प्रार्थनेला लवकरच यश येईल हा विश्वास मला आहे. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, हेच आमच्यासाठी विठ्ठलाचं राज्य असेल. आमचा नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर असावा, ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात आणखी मोठ्या पदावर जावेत. त्यांची लोकप्रियता देशात किती आहे, हे बिहारच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना दिसले आहे, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.
Amol Mitkari News: रोहित पवारांना महायुतीच्या मांडीवर बसण्याची घाई झालेय, रोहित पवारांच्या टीकेला आमदार अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर
राज्यात भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या कुबड्यांची आवश्यकता संपली आहे. त्यामुळे या कुबड्या भाजप जाळणार असल्याची टीका शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. रोहित पवार यांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केला आहे. रोहित पवार यांनाच महायुतीच्या मांडीवर बसण्याचे डोहाळे लागल्याचा टोला त्यांनी लगावलाय. 'घरी नाही दाणा, तरी बाजीराव म्हणा' अशी अवस्था रोहित पवारांची झाल्याचा चिमटा मिटकरींनी रोहित पवारांना काढलाय. सत्तेविना अस्वस्थ झालेले रोहित पवार म्हणूनच अशा प्रकारचे 'ट्वीट' करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे आमदार मिटकरी म्हणाले. यांना कशाची 'लगीन घाई' झाली हे आम्हाला माहिती आहे. मात्र, यांना मांडीवर घ्यायचं की काय करायचं?, याची नोंद महायुतीच्या डायरीत असल्याचा टोला मिटकरींनी रोहित पवारांना लगावलाये. रोहित पवारांनी आपल्या पक्षाचे दुकान किती राहिलं, हे पाहावं. दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहू नये, असा सल्ला यावेळी आमदार मिटकरी यांनी रोहित पवारांना दिलाय.
आणखी वाचा
अजितदादा म्हणाले सारखं माफ, सारखं फुकट, राजू शेट्टी म्हणाले सरकारच्या धोरणामुळं शेतकरी कर्जबाजारी



















