एक्स्प्लोर

Twitter Down : पुन्हा एकदा ट्विटर डाऊन, जगभरातील नेटकरी त्रस्त, काही वेळातच सेवा पूर्ववत

Twitter Users Faced Trouble : गेल्या महिन्यातही सुमारे तासभर ट्विटर डाउन होते. याआधी 17 फेब्रुवारीलाही युजर्सना अशाच समस्यांना सामोरं जावं लागलं होतं.

Twitter Users Faced Trouble : पुन्हा... पुन्हा... आणि पुन्हा.... ट्विटर पुन्हा एकदा डाऊन झाल्यानं नेटकरी हैराण झाले आहेत. मंगळवारी म्हणजेच, 9 ऑगस्ट रोजी ट्विटर काही काळासाठी ट्विटर डाऊन झालं होतं. डाउन डिटेक्टर वेबसाइट (Down Detector Website) वर या समस्येबाबत हजारो रिपोर्ट्स आले होते. MacRumors नं याबाबत माहिती देताना सांगितलं की, युजर्सना Twitter वापरताना अडचणी येत होत्या. त्यानंतर एक पॉपअप नोटीस (Pop Up Notice) दिसत होती.  दरम्यान, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मनं (Micro-Blogging Platform) समस्या सोडवल्यानंतर युजर्सना त्याबाबत माहिती दिली. 

ट्विटर सपोर्ट अकाउंट (Twitter Support Account) ने ट्विटर डाऊन झाल्याचं मान्य केलं. त्यावेळी त्यांनी लिहिलं की, "अनेक युजर्सना ट्विटर वापरताना अडचणींचा सामना करावा लागतोय. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या टाइमलाइनवर परत आणण्यासाठी काम करत आहोत."

नेमकं काय झालं होतं? 

ट्विटर सेवा पूर्ववत केल्यानंतर जवळपास अर्धा तासांनी ट्विटर सपोर्टनं एक ट्वीट पोस्ट केलं. त्यामध्ये लिहिलं होतं की, "आम्ही समस्या सोडवली आहे. आम्ही अंतर्गत प्रणालीत बदल केला, जो नियोजित प्रमाणे झाला नाही. ट्विटर सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे. मला माफ करा!"

गेल्या महिन्यातही झालेलं ट्विटर डाऊन 

गेल्या महिन्यातही सुमारे तासभर ट्विटर डाऊन होतं. याआधी 17 फेब्रुवारीलाही युजर्सना अशाच समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. यादरम्यान ट्विटर डाऊनवरुन सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत होता. 

एलन मस्कसोबतची ट्विटरची कायदेशीर लढाई अद्याप सुरुच 

ही तांत्रिक समस्या अशा वेळी आली आहे, जेव्हा ट्विटरची टेस्लाचे (Tesla)  सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांच्यासोबत कायदेशीर लढाई सुरू आहे. मस्क यांनी 44 डॉलर अब्ज अधिग्रहण करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्विटरनं त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. 

काही काळासाठी गूगलही झालं होतं डाऊन 

टकऱ्यांचं लोकप्रिय सर्च इंजिन असलेलं Google डाऊन झालं आणि काही काळासाठी अनेकांचं काम ठप्प झालं. मंगळवारी म्हणजेच, 9 ऑगस्टच्या सकाळी जवळपास 7 वाजता जगभरात सर्च इंजिन गूगल (Google) तब्बल 10 मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. दरम्यान, कंपनीकडून तात्काळ याप्रकाराची दखल घेण्यात आली. त्यानंतर काही काळातच गुगलच्या सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्या. त्याच वेळी, सेवा अचानक बंद झाल्यामुळे, जागतिक स्तरावर अनेक वापरकर्त्यांना समस्यांना सामोरं जावं लागलं. मात्र, गूगल डाऊन होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget