एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्रायंफची नवी बाईक 'बॉनव्हील T100'चं लवकरच लाँचिंग, किंमत 10 लाख
मुंबई: ट्रायंफनं आपली नवी बाईक 'बॉनव्हील T100' हे मॉडेल ट्रायंफने नव्याने बाजारात आणली आहे. 'बॉनव्हील' ही बाईक अनेक रायडर्सची 'ड्रीम बाईक' आहे. ट्रायंफच्या इतर मॉडेल्सच्या तुलनेत बॉनव्हीलची लोकप्रियता प्रचंड आहे. तुलनाच करायची तर रॉयल एनफिल्डच्या बुलेट 500 सारखी साधी सरळ रचना पण परफॉर्मन्सबद्दल विचाराल तर तिथं मात्र तुलना होऊच शकत नाही. रस्ता कसाही असो, वातावरण कसलंही असो 'बॉनव्हील' रस्त्यावर सम्राटासारखी वावरते.
ट्रायंफने 'बॉनव्हील T100' ही गाडी संपूर्णपणे नव्याने जन्माला न घालता 'बॉनव्हील'च्या दोन आधीच्या मॉडेल्समधल्या सर्वोत्तम गोष्टी घेऊन बनवली आहे. म्हणजेच या गाडीचं इंजिन हे 'बॉनव्हील स्ट्रीट ट्वीन' या बाईकचं आहे तर चेसीस आणि बॉडी स्ट्रक्चर हे 'बॉनव्हील T120' या बाईकमधून उचललं आहे.
आता तुम्ही विचाराल की अशा उचलेगिरीतून कंपनीनं नेमकं काय साध्य केलं ?
तसं पाहायला गेलं तर 'बॉनव्हील स्ट्रीट ट्वीन' या गाडीचं 900cc क्षमतेचं इंजिन कोणत्याही आणि कसल्याही रस्त्यांवर सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी पुरेसं आहे. 'बॉनव्हील T120' या बाईकचं देखणं रुप साऱ्यांनाच आकर्षित करुन घेत आहे. त्यात आणखी भर टाकत 'बॉनव्हील T100' आकारला आली आहे. त्यामुळे दिसणं आणि असणं या दोन्ही गोष्टी एकाचवेळी ग्राहकांना देण्याचा कंपनीचा हेतू 'बॉनव्हील T100' च्या निमित्ताने पूर्ण झाला आहे.
जर्मनीतल्या इंटरमोट मोटरसायकल ट्रेड शोमध्ये ट्रायंफने ही बाईक पहिल्यांदा सादर केली. भारतात ही गाडी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतात या गाडीची अंदाजे किंमत असेल सुमारे 10 लाख रुपये. भारतात सध्या या श्रेणीतली सगळ्यात जास्त विकली जाणारी बाईक म्हणजे बुलेट. जिची किंमत जवळपास दीड लाखांच्या घरात आहे. किमतीमधल्या या फरकामुळेच 'बोनव्हील' ही चाहत्यांची फक्त 'ड्रीम' बाईकच बनून राहिली आहे. आता 'बोनव्हील T100' या गाडीला कसा प्रतिसाद मिळतो ते लवकरच कळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement