TickTock in India : टिकटॉक परतणार? नाव अन् लूक बदलून भारतात पुन्हा लॉन्च होण्याची शक्यता
TickTock in India : टिकटॉक परतणार? भारतात टिकटॉक पुन्हा येण्याची शक्यता. TikTok चं स्वामित्तव असलेली कंपनी ByteDance ने आपल्या शॉर्ट व्हिडीओ अॅपच्या नव्या ट्रेडमार्कसाठी प्रयत्न करत आहे.
TickTock in India : टिकटॉक प्रेमींसाठी आनंदाची बातमी... प्रसिद्ध चिनी व्हिडीओ शेअरिंग अॅप TikTok लवकरच पुन्हा एकदा भारतात वापसी करण्याची शक्यता आहे. PUBG प्रमाणेच नवं नाव आणि लूकसह टिकटॉक लॉन्च केलं जाऊ शकतं. टेक रिपोर्टनुसार, TikTok चं स्वामित्तव असलेली कंपनी ByteDance ने आपल्या शॉर्ट व्हिडीओ अॅपच्या नव्या ट्रेडमार्कसाठी कंट्रोलर जनरल ऑफ पेटेंटस, डिजाइन अॅन्ड ट्रेड मार्कमध्ये अप्लाय केलं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी जूनमध्ये केंद्र सरकारने 56 चिनी अॅपवर बंदी घातली होती. ज्यामध्ये टिकटॉकचाही समावेश होता. सरकारनं बंदी घातल्यानंतर टिकटॉक सर्वच अॅप स्टोअरवरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर भआरतीय यूजर्ससाठी टिकटॉक कुठेच उपलब्ध नव्हतं.
नव्या ट्रेडमार्कमध्ये बदलली TikTok ची स्पेलिंग
टिप्स्टर मुकुल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, TikTok चं स्वामित्तव असलेली कंपनी ByteDance द्वारे 6 जुलै फाईल करण्यात आलेल्या या नव्या ट्रेडमार्कमध्ये TikTok ची स्पेलिंग बदलण्यात आली आहे. यावेळी कंपनीने TickTock या नावाने ट्रेडमार्कसाठी अॅप्लिकेशन दिलं आहे. हे ट्रेडमार्क नियम, 2002मधील चौथ्या शेड्यूलच्या Class 42 अंतर्गत दाखल करण्यात आलं आहे.
पुनरागमनासाठी भारत सरकारसोबत चर्चा सुरु
मिळालेल्या माहितीनुसार, ByteDance आपलं अॅप भारतात पुन्हा लॉन्च करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करत आहे. कंपनीने केंद्र सरकारला विश्वास दिला आहे की, ते नव्यानं लागू करण्यात आलेल्या सर्व आयटी नियमांचं पालन करतील. दरम्यान, ByteDance ने 2019 मध्ये बॅन होण्यापूर्वीच भारतात आपला चीफ नोडल आणि ग्रीवेन्स ऑफिसर नियुक्त केले होते. हे नव्या आयटी नियमांच्या महत्त्वाच्या अटींपैकी एक आहे.
बॅन होण्यापूर्वी TikTok चे भारतात 20 कोटी युजर्स
शॉर्ट व्हिडीओ अॅप TikTok भारतात खास पॉप्युलर होता. टिकटॉक बॅन करण्यात आलं होतं, त्यावेळी देशात जवळपास 20 कोटी युजर्स होते. TikTok बॅन झाल्यानंतर फेसबुकच्या इंस्टाग्राम आणि YouTube ने याच पार्श्वभूमीवर नवं फिचर लॉन्च केलं होतं. इंस्टाग्रामवर Reels आणि YouTube वर Shortsच्या नावाने युजर्ससाठी शॉर्ट व्हिडीओ पोस्ट करण्याचं फिचर देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त अनेक शॉर्ट व्हिडीओ अॅप्सही युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.