(Source: ECI/ABP News/ABP Majha)
THOMSON Alpha Series : थॉमसन ब्रँडनं भारतात लाँच केली अल्फा टिव्ही सीरीज; पाहा फिचर्स आणि किंमत
THOMSON Alpha TV Series : थॉमसन अल्फा टिव्हीसोबत ग्राहकांना 30W चा स्पिकर देखील मिळणार आहे.
THOMSON Alpha TV Series : थॉमसन (thomson) या फ्रान्सच्या ब्रँडनं भारतामध्ये त्यांची थॉमसन अल्फा ही सीरिज लाँच केली आहे. थॉमसन अल्फा या टिव्हीच्या सीरिजमधील 32 इंचाच्या टिव्हीची किंमत 9,999 रुपये आहे. या टिव्हीच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. थॉमसन अल्फा टिव्हीसोबत ग्राहकांना 30W चा स्पिकर देखील मिळणार आहे. त्याचबरोबर थॉमसन अल्फा टिव्हीमध्ये 512MB रॅम, 4 जीबी स्टोरेज आणि Miracast बरोबरच WI-Fi, HDMI, USB कनेक्टिव्हिटी हे फिचर्स तुम्हाला मिळतील. जाणून घेऊयात या टिव्हीबाबत...
थॉमसन अल्फा टिव्ही सीरिजमधील टिव्हीचे खास फिचर्स
अल्फा टिव्ही सीरिजमध्ये ग्राहकांना एचडी रेडी स्क्रीन, बेजललेस स्क्रीन आणि सराउंड साउंड हे फिचर्स मिळतील. थॉमसन अल्फा टिव्हीमध्ये यूट्यूब, प्राइम वीडियो, सोनी लिव, Zee5 आणि Eros now हे अॅप्स प्री-लोडेड मिळतील.
वॉशिंग मशिन देखील केली लाँच
थॉमसन कंपनीनं नवी वॉशिंग मशिन देखील लाँच केली आहे. थॉमसननं ही नवी वॉशिंग मशिन 8 किलोग्राम आणि 9 किलोग्राम व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. थॉमसन कंपनीनं आपल्या नवीन वॉशिंग मशीनबद्दल दावा केला आहे की. या मशीनचा वापर करताना कमी पाणी लागते आणि कपड्यांवर डाग राहात नाहीत. या मशिनमध्ये गरम पाणी करण्यासाठी तीन पद्धती उपलब्ध आहेत. चांगले धुण्यासाठी स्क्रबिंग, स्टीपिंग, रोलिंग आणि स्विव्हलिंग सारखी वैशिष्ट्ये देखील मशीनमध्ये देण्यात आली आहेत. मशिनसोबत चाईल्ड लॉकचीही सुविधा आहे. सादर केलेल्या 2 प्रकारांमध्ये, 8 किलोच्या मशीनची किंमत 15,999 रुपये आणि 9 किलोच्या मशीनची किंमत 16,999 रुपये आहे.
महत्वाच्या बातम्या :