एक्स्प्लोर

2021च्या उत्तरार्धात भारतात '5G' सेवा लॉन्च करणार जियो; मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा

भारतात 2021च्या उत्तरार्धात 5जी क्रांती होणार असून जियो 5G लॉन्च करणार असल्याचं जियोचे सर्वेसर्वो मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.

नवी दिल्ली : देशभरातील इंटरनेट युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. भारतात पुढच्या वर्षी म्हणजेच, 2021 च्या उत्तरार्धात 5जी सेवा लॉन्च होण्याची शक्यता असल्याची माहिती रिलायन्स जियोचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली आहे. दरम्यान, यासाठी काही बदल आणि वेगाने प्रक्रिया करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत ही प्रक्रिया सुलभ आणि स्वस्त केली जात नाही तोपर्यंत ती सर्वांपर्यंत पोहोचणं अशक्य आहे.

मुकेश अंबानी बोलताना म्हणाले की, 2021मध्ये जियो भारतात 5G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही 5G सर्विस पूर्णतः स्वदेशी असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि टेक्नॉलॉजीही स्वदेशी असणार आहे. जियोमार्फत आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहोत.

ते म्हणाले की, भारताला 5G स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घेणं आवश्यक आहे. त्याचसोबत त्यांनी हेदेखील सांगितलं की, जियो 5G नेटवर्क सेवेचं नेतृत्त्व करणार आहे. भारतात येणाऱ्या काही दिवसांत सेमी कन्डक्टरचं मॅन्युफॅक्चरिंगचं केंद्र बनू शकतं. आम्ही सेमी कन्डक्टरसाठी केवळ बाहेरील देशांच्या मदतीवर अवलंबून राहू शकत नाही.

देशात सध्या 30 कोटी 2G फोन युजर्स आहेत. या लोकांपर्यंत स्मार्टफोन अद्याप पोहोचलेला नाही आणि त्यासाठी त्यांनी धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. अंबानी म्हणाले की, आम्ही डिजिटल पद्धतीने खूप चांगले कनेक्ट झालो आहोत. तरिदेखील 300 मिलियन लोक आताही 2G स्मार्टफोनचा वापर करत आहेत.

भारतात 2021 मध्ये 5G लॉन्च होणार; दूरसंचार कंपनी एरिक्सनचा दावा

प्रमुख दूरसंचार कंपनी एरिक्सनच्या एका रिपोर्टनुसार, जगभरात 2026 पर्यंत 3.5 अरब 5जी कनेक्शन असतील, तर भारतात 5जी कनेक्शनची संख्या ही जवळपास 35 कोटी इतकी असेल. एरिक्सनचे नेटवर्क अधिकारी (दक्षिण पूर्व आशिया, ओशिनिया आणि भारत) प्रमुख नितीन बंसल यांनी सांगितले की, जर स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील वर्षाच्या सुरुवातीला झाला, तर भारताला त्याचं पहिलं 5जी कनेक्शन 2021 मध्येच मिळू शकतं. एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट - 2020 नंतर जगभरात एक अब्ज लोक असे असतील, जे जागतिक लोकसंख्येचा 15 टक्के हिस्सा असून त्यांची 5G कव्हरेजपर्यंत पोहोच असेल.

रिपोर्टनुसार, 2026 पर्यंत जगभरातील 60 टक्के लोकसंख्या 5G सेवेचा लाभ घेत असेल. तसेच तोपर्यंत 5G ग्राहकांची संख्या वाढून 3.3 अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात 5G ग्राहकांची संख्या तोपर्यंत 35 कोटींचा आकडा पार करू शकते. जी भारतातील एकूण मोबाईल वापरकर्त्यांच्या एकूण 27 टक्के इतकी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget