WhatsApp च्या विवादास्पद पॉलिसीचा फायदा Telegram ला, बनलं सर्वाधिक डाऊनलोड झालेलं नॉन गेमिंग अॅप
जानेवारी महिन्यात Telegram हे अॅप सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलं आहे अशी एक आकडेवारी सांगते. WhatsApp च्या विवादास्पद पॉलिसीचा फायदा Telegram ला झालेला दिसतो. तसेच Signal च्या वापरकर्त्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
WhatsApp ने मध्यंतरी नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली. त्या विषयी त्याच्या वापरकर्त्यांत नाराजी दिसून आली होती. त्यानंतर WhatsApp ने एक पाऊल मागे घेतलं. पण त्याचा फायदा Telegram ला झाल्याचं स्पष्ट झालंय. जानेवारी 2021 मध्ये Telegram हे सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेलं नॉन-गेमिंग अॅप बनलं आहे.
Telegram ने याबाबतीत Tiktok चे रेकॉर्ड मोडले असून सेंसर टॉवरच्या रिपोर्टनुसार जानेवारी 2021 मध्ये Telegram या मेसेजिंग अॅपला जवळपास साडे सहा कोटी लोकांनी डाऊनलोड केलं आहे. जानेवारी 2020 च्या तुलनेत ही 3.8 टक्क्यांची वाढ आहे असंही सांगण्यात आलंय.
या नव्या आकडेवारीतून हे स्पष्ट होतंय की Telegram ला WhatsApp च्या विवादास्पद पॉलिसीचा फायदा झाला. WhatsApp ने आपल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीची घोषणा केली आणि यूजर्सनी त्याला पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यामुळे Telegram आणि Signal अॅपच्या डाऊनलोडमध्ये वाढ झाली आहे.
Telegram Update: टेलिग्रामचं नवीन फीचर, व्हॉट्सअॅपचे चॅट सहज इम्पोर्ट होणार
भारतात सर्वाधिक डाऊनलोड गुगल प्ले स्टोअरवर Telegram हे सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलं आहे तर अॅपलच्या अॅप स्टोअरवर ते चौथ्या क्रमांकावर डाऊनलोड करण्यात आलं आहे. टेलिग्राम हे डिसेंबर 2020 मध्ये नवव्या स्थानी होतं. आता ते पहिल्या स्थानी आलं आहे. जानेवारीत डाऊनलोड करण्यात आलेल्या 63 मिलियन पैकी जवळपास 24 टक्के वापरकर्ते एकट्या भारतातून आहेत. त्यानंतर इंडोनेशियाचा क्रमांक लागतोय. त्या देशात 10 टक्के नव्या वापरकर्त्यांनी Telegram डाऊनलोड केलं आहे.
Signal ला फायदा WhatsApp च्या विवादास्पद पॉलिसीचा फायदा केवळ Telegram ला झाला नसून Signal या अॅपलाही झाला आहे. Signal हे Telegram नंतर दुसऱ्या क्रमांकावर डाऊनलोड करण्यात आलं असून ते अॅपलच्या स्टोअरमध्ये टॉप टेनमध्ये पोहचलं आहे.
SpaceX आणि टेस्ला चे सीईओ ईलॉन मस्कने Signal अॅप हे अधिक सुरक्षित असल्याचं सांगितल्यानंतर Signal च्या वापरकर्त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं. भारतातील टॉप टेन अॅप डाऊनलोड मध्ये WhatsApp चा पाचवा क्रमांक लागतोय.
नोव्हेंबरमध्ये एयरटेलच्या ग्राहकाच्या संख्येत 43.7 लाखांची वाढ- TRAI