5G Smartphones | 5G स्मार्टफोन घ्यायचा विचार असेल तर स्वस्त पर्याय पाहा...
5G स्मार्टफोन महाग असले तरी कमी किमतीत 5G फोनचे पर्याय उपलब्ध आहेत. बाजारात 20,000 ते 40,000 रुपयांत कोणते 5जी स्मार्टफोन उपलब्ध आहेत यावर एक नजर टाकूयात.
Tech News | स्मार्टफोनच्या टेक्नोलॉजीमध्ये दिवसेंदिवस मोठे बदल होताना दिसत आहेत. हेच कारण आहे की भारतात 5G फोन वेगाने लॉन्च होताना दिसत आहेत. 5G तंत्रज्ञान अद्याप भारतात आले नसले तरीही स्मार्टफोन कंपन्या यूजर्सच्या गरजा लक्षात घेत 5G नेटवर्कसह नवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहे. 5G स्मार्टफोन महाग असले तरी कमी किमतीत 5G फोनचे पर्याय उपलब्ध आहेत. बाजारात 20,000 ते 40,000 रुपयांत कोणते 5जी स्मार्टफोन उपलब्ध आहेत यावर एक नजर टाकूयात.
Vivo V20 Pro
Vivo V20 Pro हा स्मार्टफोन 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह सिंगल व्हेरिएंट असेल. यात 6.44 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आणि Android 11 वर कार्य करतो. मेमरी कार्डद्वारे याची मेमरी वाढवता येते. फोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी आहे. या मोबाईलमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. यात प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सल, दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सल, तिसरा 2 मेगापिक्सलचा सेन्सर आणि फ्रंटसाठी कॅमेऱ्यासाठी ड्युअल सेन्सर आहे. ज्यामध्ये पहिला सेन्सर 44 मेगापिक्सलचा आणि दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सलचा आहे.
Moto G 5G
जर तुमचं बजेट 20 हजारपर्यंत असेल तर मोटोरोलाचा मोटो जी 5 जी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. या फोनमध्ये आपल्याला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. यासह आपण मायक्रोएसडी कार्डसह स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवू शकता. फोनला 6.67 इंचाचा फुल एचडी + एलसीडी आयपीएस एचडीआर 10 मॅक्स व्हिजन डिस्प्ले मिळेल. या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर आहे. जे अँड्रॉइड 10 वर काम करते. फोनला पावरफुल बनवण्यासाठी 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. आपल्याला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा सेन्सर सेकंडरी कॅमेरा, तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 20,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Xiaomi Mi 10T Pro
तुमचं बजेट 40 हजारांपर्यंत असेल तर तुम्ही शाओमीचा हा 5G स्मार्टफोन खरेदी करू शकता. या फोनची किंमत 39,999 रुपये आहे. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी हा एक उत्तम फोन आहे. तुम्हाला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. ज्याचा अपर्चर f/2.4 आहे. दुसरा सेन्सर 13 मेगापिक्सलचा आहे, ज्याचा f/ 2.4 अपर्चर आहे. तिसरा कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे, ज्याचे अपर्चर f/2.4 आहे. सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा अल्ट्रा-क्लीयर सेन्सर देण्यात आला आहे. आपल्याला फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी + एलसीडी डॉट डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आहे जो अँड्रॉइड 11 वर कार्य करतो.