OnePlus 9 सीरिज लवकरच लॉन्च होणार, काय असतील स्पेसिफिकेशन?
OnePlus 9 सीरिजचे फोन व्हर्च्युअल इव्हेंट लॉन्च केले जातील. हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार 23 मार्चला सायंकाळी 7.30 वाजता होईल.
Technology News : OnePlus 9 सीरिज लवकरच लॉन्च होणार आहे. OnePlus 9 सीरिज येत्या 23 मार्चला लॉन्च होऊ शकते, असं बोललं जात आहे. या सीरिजअंतर्गत OnePlus 9, OnePlus 9 Pro आणि OnePlus 9 E हे मोबाईल लॉन्च केले जाऊ शकतात. OnePlus 9 ही सीरिज केवळ अॅमेझॉनवर लॉन्च केली जाणार आहे. OnePlus 9 सीरिजचे फोन व्हर्च्युअल इव्हेंट लॉन्च केले जातील. हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता होईल.
OnePlus 9 फोनेचे स्पेसिफिकेशन काय असू शकतात?
लीक झालेल्या अहवालानुसार, OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी + फ्लॅट डिस्प्ले असेल. ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज असेल. त्यामध्ये पंच होलही देण्यात येईल. तर OnePlus 9 Pro मध्ये 6.78 इंच फुल क्यूएचडी + डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज असेल. दोन्ही स्मार्टफोनच्या वर उजव्या बाजूला पंच-होल नॉच दिला जाण्याची शक्यता आहे. OnePlus 9 भारतात 54,999 रुपये आणि 59,999 रुपये किंमतीसह लॉन्च केला जाऊ शकतो.
कोणता कॅमेरा असू शकतो?
OnePlus 9 सीरिजच्या फोनला मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. यासह, 20 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा अल्ट्रा-वाइड-अँगल आणि OIS सपोर्टसह 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा दिला जाऊ शकतो.
OnePlus स्मार्टवॉच देखील लॉन्च होणार?
वनप्लस 9 सीरिजसह कंपनी आपल्या पहिल्या स्मार्टवॉच देखील लॉन्च करु शकते. वनप्लस वॉच स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे.