एक्स्प्लोर
आता नोटबंदीवर अॅपद्वारे थेट पंतप्रधानांना प्रतिक्रिया कळवा
मुंबई: 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र आता स्वतः पंतप्रधान मोदींनी थेट सर्वसामान्यांच्या नोटबंदीवर प्रतिक्रिया मागवल्या आहेत. यासाठी मोबाईलवर ‘नरेंद्र मोदी अॅप’च्या माध्यमातून मत नोंदवण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.
या अॅपवरुन एक हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर नागरिकांना मत व्यक्त करण्यास मोदींनी सांगितले आहे. एका सर्व्हेच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरं सहभागी व्यक्तींना द्यावी लागणार आहेत. हे अॅप गूगल प्ले स्टोरवरुन इन्सॉल केल्यानंतर यामध्ये तुमच्या मतदार ओळखपत्राच्या आधारे सुरुवातीला नोंदणी करावे लागते. त्यानंतर नोटाबंदीच्या निर्णयासंदर्भातील विविध प्रश्नांद्वारे तुमची मते नोंदवली जात आहेत. दरम्यान, यापूर्वी देखील नोटाबंदीसंदर्भातील 2000 रुपयाच्या नव्या नोटा ओळखण्याचे 'किनोट' नावाचे अॅप बाजारात उपलब्ध झाले होते. या अॅपने 2000 रुपयांची नोट स्कॅन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीचे दिनांक 8 नोव्हेंबर रोजीचे भाषण सुरु होत होते.I want your first-hand view on the decision taken regarding currency notes. Take part in the survey on the NM App. https://t.co/TYuxNNJfIf pic.twitter.com/mWv2frGn3R
— Narendra Modi (@narendramodi) November 22, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement