एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान मोदी ट्विटरवर लोकप्रिय का? अमेरिकेतील विद्यापीठाचं अध्ययन
अमेरिकेतल्या एका विद्यापीठाने पंतप्रधान मोदींच्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवरील लोकप्रियतेवर अध्ययन केलं आहे. या अध्ययनातून अनेक रंजक बाबी समोर आल्या आहेत.
वॉशिंग्टन : केंद्र सरकारच्या साडे तीन वर्षांच्या काळातील अनेक निर्णयांमुळे विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनलेल्या पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ सोशल मीडियात उतरणारा वेगळा वर्ग आहे. त्यांच्या भाषणसह सोशल मीडियात अजूनही त्यांचे लाखो चाहते आहेत. दोनच दिवसांपूर्वी एका सर्वेक्षण समोर आलं, यातही भारतीय राजकारण्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं होतं..
त्यातच आता अमेरिकेतल्या एका विद्यापीठाने पंतप्रधान मोदींच्या मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवरील लोकप्रियतेवर अध्ययन केलं आहे. या अध्ययनातून अनेक रंजक बाबी समोर आल्या आहेत.
अमेरिकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन स्कूल ऑफ इन्फोर्मेशन याबाबतचं अध्ययन केलं असून, यामध्ये पंतप्रधान मोदींच्या सहा वर्षातील ट्वीटचा अभ्यास केला आहे. तर यातील निष्कर्ष इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिकेशनमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
या अध्ययनासाठी पंतप्रधान मोदींच्या विविध क्षेत्रातील एकूण 9 विषयातील ट्वीटचं अध्ययन करण्यात आलं. यात क्रिकेट, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, मनोरंजन, व्यंग, भ्रष्टाचार, विकास, परराष्ट्र धोरण, हिंदू धर्म, विज्ञान आणि उद्योग आदी क्षेत्रांचा समावेश होता.
या अध्यायनामध्ये विद्यापीठाच्या अभ्यासकांनी पंतप्रधान मोदींच्या 9000 ट्वीटचा अभ्यास केला. या अध्ययनाबाबत माहिती देताना विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक आणि लेखक जॉयोजीत पाल यांनी सांगितलं की, “या अध्ययनाद्वारे आम्ही पंतप्रधान मोदींची लोकप्रियता अजूनही का कायम आहे? याचा शोध घेतला. मोदी ज्याप्रकारे व्यंग साधतात, त्यामुळे सोशल राजकीय क्षेत्रावर त्याचे वेगळेच पडसाद उमटतात. सोशल मीडियात हे पडसाद मुख्यत: पाहायला मिळतात. त्यांचे हेच व्यंगात्मक ट्वीट अनेकवेळा रिट्विटही होतात.”
या अध्ययानादरम्यान अभ्यासकांना जाणवलं की, मोदींच्या अनेक व्यंगात्मक टिप्पणी मुख्यत: निवडणूक प्रचारासाठीच केंद्रीत असतात. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी ज्या प्रकारे ट्वीट केले, त्यातून त्यांनी मुख्य विरोधी पक्षाला भ्रष्ट आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ‘राहुल बाबा’ तसेच ‘शेहजादा’ म्हणून संबोधलं. या ट्वीटमधून ते संकेत देत होते की, काँग्रेसची पाळमुळं आता नष्ट होत आहेत.
पाल यांच्या मते, मोदींनी आपल्या वक्तव्यांतून विरोधकांवर जोरदार हल्ले चढवले. हुशारीने शब्दांचा वापर करुन, विरोधकांवर निशाणा साधला. तसेच यातून विरोधकांना शेलक्या शब्दात कोपरखळ्याही मारल्या. ज्यामुळे लोकांनी त्यांचे ट्वीट सर्वाधिक लोकप्रिय झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement