Google on Electricity Scam : इलेक्ट्रिसिटी स्कॅमसंदर्भात गुगलकडून सुरक्षिततेबाबत सूचना; व्हिडीओ जारी करत दिल्या टिप्स
Google on Electricity Scam : इलेक्ट्रिसिटी स्कॅमसंदर्भात गुगल आणि केंद्र सरकारने सुरक्षिततेबाबत टिप्स दिल्या आहेत. तसेच ग्राहकांना ऑनलाईन अधिक सावध राहण्यास सांगितलं आहे.

Electricity Scam : आजकाल गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी वेगवेगळ्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना पाहायला मिळतात. यामुळेच सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) वाढ झाली आहे. इलेक्ट्रिसिटी स्कॅमसंदर्भात गुगलकडून (Google) सुरक्षिततेबाबत व्हिडीओ जारी करत टिप्स दिल्या आहेत. गुन्हेगार खोट्या लिंकच्या आधारे तुमच्या फोनमधील डेटा चोरून तुमच्या अकाऊंटमधील पैसे लंपास करतात. अनेक वेळा तुमच्या मोबाईल वेगवेगळ्या फसव्या लिंक पाठवल्या जातात. या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या अकाऊंट संदर्भात माहिती भरण्यास सांगितलं जाते आणि हीच संधी साधत हॅकर्स तुमचं अकाऊंट हॅक करतात आणि ग्राहकांना चांगलच गंडा घालतात. असे सायबर गुन्ह्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
केंद्र सरकारचंही सर्तकतेचं आवाहन
अलिकडे इलेक्ट्रिसिटी स्कॅम (Electricity Scam) समोर आला होता. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर तुमचं वीजबील थकल्याचा मेसेज आणि त्यासोबत एक लिंक पाठवली जायची. या लिंकवर तुम्हांला तुमच्या अकाऊंट डिटेल्स आणि इतर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितलं जातं. या बनावट लिंकवरून हॅकर्स तुमचा डेटा चोरतात आणि ग्राहकांना गंडा घालतात. अशी अनेर प्रकरण समोर आली होती. त्यानंत आता गुगल इंडिया केंद्र सरकारसोबत मिळून ग्राहकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
Spotted an electricity scam? As scammers get more creative in their ways, it's up to us to stay more alert online.
— Google India (@GoogleIndia) August 30, 2022
Raho Do Kadam Aagey by never clicking on unknown links, and never sharing your bank details. Stay #SaferWithGoogle.
सायबर क्राईमपासून सावध राहा
यासाठी गुगल इंडियाने सायबर क्राईमपासून सावध राहण्यासाठी काय करायचं याबद्दलच्या सूचना केल्या आहेत. गुगल इंडियाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सांगितलं आहे की, स्कॅमर त्यांच्या मार्गाने अधिक प्रगत होत हॅकींगसाठी नवीन शक्कल लढवत आहेत. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहणं आपल्यावर अवलंबून आहे. दोन पाऊल पुढे राहा, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि कधीही तुमच्या बँक खात्यासंबंधित तपशील शेअर करू नका. गुगलसोबत सुरक्षित राहा.
गुगलसोबत सुरक्षित राहा
गुगलने ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करताना अधिक सुरक्षित राहण्यास सांगितलं आहे. कोणत्याही अनोखळी लिंकवर क्लिक करू नका, कारण हॅकर्स बनावट लिंकच्या साहाय्याने तुमची वैयक्तिक माहिती चोरून अनेकांना गंडा घालत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी दोन पाऊलं पुढे जात सर्तक राहण्याची गरज आहे. गुगलकडूनही वेळोवेळी असुरक्षित लिंकबाबत सावध केलं जातं त्याकडेही दुर्लक्ष करु नका.
महत्वाच्या बातम्या
Pune Crime News: महावितरणच्या बनावट कर्मचाऱ्याने महिलेची 10 लाख रुपयांची केली लुट; पुण्यातील धक्कादायक प्रकार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
