Pune Crime News: महावितरणच्या बनावट कर्मचाऱ्याने महिलेची 10 लाख रुपयांची केली लुट; पुण्यातील धक्कादायक प्रकार
काही अॅप्स डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेटद्वारे वीजबिल भरण्यास सांगणाऱ्या महावितरणच्या बनावट कर्मचाऱ्याने महिलेची 10 लाख रुपयांची फसवणूक केली.
Pune Crime News: इंटरनेटच्या मदतीने 10 लाख रुपयांची लुट केल्याची घटना घडली आहे. काही अॅप्स डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेटद्वारे वीजबिल भरण्यास सांगणाऱ्या महावितरणच्या बनावट कर्मचाऱ्याने महिलेची 10 लाख रुपयांची फसवणूक केली. 53 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पिंपरी चिंचवड पोलिसांतर्गत सांगवी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय घडलं?
एका अज्ञात व्यक्तीने महिलेशी तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्या व्यक्तीने तक्रारदाराला सांगितले की तिची वीज बिले बाकी आहेत आणि त्यासाठी तिला तिचा फोन अपडेट करायचा आहे. त्यानंतर, त्या व्यक्तीने तिला क्विक सपोर्ट अॅप आणि एनी डेस्क अॅप डाउनलोड करण्यास सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिलेने असे केल्यानंतर आरोपीने तिच्या मोबाईलची स्क्रीन शेअर केली आणि इंटरनेटच्या मदतीने महिलेच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये काढले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील तांबे करीत आहेत.
हाय-प्रोफाइल मुलीसोबत मैत्रीचं आमिष दाखवून युवकाला 18 लाखांनी लुटलं
तरुणीसोबत मैत्रीचे आमिष दाखवून एका तरुणाचे 18 लाख 37 हजार रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे एका खासगी कंपनीत कर्मचारी आहेत. दोन महिन्यांपूर्वी रिना नावाच्या महिलेने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि एका वेबसाइटच्या माध्यमातून हाय-प्रोफाइल तरुणींशी मैत्री केली, असे तक्रारदाराने सांगितले. सगळ्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार असल्याचे रिनाने सांगितले. त्यानंतर रिनाने त्याच्या मोबाईल क्रमांकावर काही तरुणींचे फोटो त्याला पाठवले.फोटो पाठवल्यानंतर तरुणीची निवड करण्यास सांगितले. तरुणीची युवकाने निवड केली. काही दिवस त्यांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून बोलत होते. दरवेळी वेगळे पैसै भरावे लागेल असं सांगण्यात आलं. एकेक करुन तब्बल 18 लाख 37 हजार रुपये तरुणीला पाठवले.