एक्स्प्लोर
SBI कडून पेटीएमसह सर्व ई-वॉलेट ब्लॉक
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने पेटीएमसह सर्व ई-वॉलेट ब्लॉक केले आहेत. त्यामुळे आता मोबी क्विक, एअरटेल मनी आणि पेटीएम यांच्या ई-वॉलेटमध्ये एसबीआयच्या नेट बँकिंगद्वारे पैसे टाकता येणार नाहीत.
युझर्सची सुरक्षा आणि व्यवसाय या कारणांमुळे एसबीआयने हे पाऊल उचललं, असं स्पष्टीकरण एसबीआयने रिझर्व बँकेला दिलं होतं. ब्लॉक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरबीआयने एसबीआयकडून स्पष्टीकरण मागितलं होतं, असं वृत्त 'सीएनबीसी आवाज'ने दिलं आहे.
पेटीएमने सुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याने एसबीआयने ब्लॉक करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. पेटीएमवरील बंदी ही तात्पुरती असून सुरक्षेच्या कारणांचा आढावा घेऊन ई-वॉलेट सेवा अनब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं बँकेने सांगितलं.
सुरक्षा आणि व्यवसाय ही दोन कारणं यामध्ये सांगितली जात आहेत. कारण एसबीआय स्वतः SBI Buddy या आपल्या अपला प्रमोट करत आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांना इतर वॉलेटवर एसबीआय जाऊ देणार नाही, अशी चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement