एक्स्प्लोर
3 लाखाहून अधिक किंमतचे सॅमसंग QLED टीव्ही लाँच!

मुंबई: दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगनं भारतात आपला नवा QLED टीव्ही लाँच केला आहे. या नव्या टीव्हीची किंमत तब्बल 3 लाख 14 हजार एवढी आहे. सॅमसंगनं हा टीव्ही नुकताच पॅरिसमध्ये लाँच केला होता.
सॅमसंगन नव्या टीव्हीचे पाच मॉडेल भारतात लाँच केले आहेत. Q7, Q7एफ, Q8, Q8सी आणि Q9 असे पाच मॉडेल आहेत. याच्या बेसिक मॉडेलची किंमत 3 लाख 14 हजार 900 रुपये आहे. तर सर्वात महागड्या मॉडेलची किंमत 25 लाख रुपये एवढी आहे. यासाठी टीव्हीसाठी प्री-ऑर्डर बुकींग करावी लागणार आहे.
या टीव्हीसोबत इतरही ऑफर असल्याचं सॅमसंगनं जाहीर केलं आहे. या टीव्हीसोबत सॅमसंग गॅलक्सी S8+ स्मार्टफोन मोफत मिळणार आहे. पण हा स्मार्टफोन मिळवण्यासाठी तुम्हा 21 मेपूर्वी बुकींग करावं लागेल.
सॅमसंग QLED टीव्हीचे फीचर्स:
डिस्प्ले पॅनल साईज 65 इंच आणि 75 इंच अशा असणार आहेत. तर Q7 मॉडेलची डिस्प्ले पॅनल साईज 55 इंच असेल.
हे टीव्ही क्वॉनटम डॉट टेक्नोलॉजीवर तयार करण्यात आले आहेत.
नॅनो साइजचे पार्टीकल देण्यात आले आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
सातारा
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
























