एक्स्प्लोर
सॅमसंगचा नवा टॅब लॉन्च, अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोडसह जबरदस्त फीचर्स
मुंबई : सॅमसंग कंपनीने आपला नवा टॅब ‘गॅलक्सी J मॅक्स’ लॉन्च केला आहे. 7 इंचाचा डिस्प्ले असणारा हा टॅब 13 हजार 400 रुपयांना मिळणार आहे. शाओमीने नुकताच लॉन्च केलेल्या शाओमी मी मॅक्सला सॅमसंगचा हा टॅब स्पर्धक ठरणार आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ऑफलाईन आणि ऑनलाईन विक्रीला सुरुवात केली जाणार आहे.
सॅमसंगच्या इतर J सीरीजप्रमाणे या टॅबमध्येही अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड दिला आहे. या मोडवर 50 टक्के डेटा बचत होऊ शकतं. J2(2016) प्रमाणे या J मॅक्सच्या एअरटेल प्रीपेड ग्राहकांना 6 महिन्यांपर्यंत डबल डेटा ऑफर मिळणार आहे.
सॅमसंग गॅलक्सी J मॅक्सचे फीचर्स:
- 7 इंचाचा डिस्प्ले
- 1280×800 पिक्सेल रिझॉल्युशन
- 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर
- 1.5 जीबी रॅम
- 16 जीबी इनबिल्ट स्टोरेज
- एसडी कार्डच्या सहाय्याने 200 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- ड्युअल सिम सपोर्टिव्ह
- 8 मेगापिक्सेल ऑटोफोकस रिअर कॅमेरा
- 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- VoLTE फीचर
- 4G, ऑडिओ जॅक, एफएम रोडिओ, वायफाय, ब्लूटूथ 4.0, GPS कनेक्टिव्हिटी
- 4000mAh बॅटरी क्षमता
- ब्लॅक आणि गोल्ड कलर व्हेरिएंट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement