एक्स्प्लोर
तासाला 300 ते तीन हजार मोजा, भाड्याने बॉय-फ्रेण्ड मिळवा
मन मोकळं करण्यासाठी मित्र शोधायला 'रेंट अ बॉय|फ्रेण्ड' हे अॅप सुरु करण्यात आलं आहे.
मुंबई : नैराश्य घालवण्यासाठी तुम्हाला भाड्याने बॉय-फ्रेण्ड मिळू शकणार आहे. मन मोकळं करण्यासाठी मित्र शोधायला 'रेंट अ बॉय|फ्रेण्ड' हे अॅप सुरु करण्यात आलं आहे. सध्या मुंबई-पुण्यातच ही सुविधा उपलब्ध असेल.
बॉय-फ्रेण्ड म्हणजे पुरुष मित्र अशी या अॅपची संकल्पना आहे. रुढार्थाने ज्याला 'बॉयफ्रेण्ड' म्हटलं जातं, तसा प्रियकर तुम्हाला मिळणार नाही. अॅपच्या नावात 'बॉय-फ्रेण्ड' या दोन शब्दांमध्ये असलेला स्पेस हेच सुचवत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. बॉय-फ्रेण्डसोबत शारीरिक जवळीक किंवा खाजगी जागेतील भेट घेता येणार नाही.
विविध वयोगटातील व्यक्तींमध्ये असणारं नैराश्य लक्षात घेता त्यांना एका चांगल्या मित्राची गरज असते. याच विचारातून 29 वर्षीय कौशल प्रकाशने हा अनोखा व्यवसाय सुरु केला. सध्या ही सुविधा केवळ मुंबई आणि पुण्यात सुरु करण्यात आली असली तरी येत्या काळात तिचा इतर शहरांत विस्तार करण्यात येईल.
सेलिब्रेटी मित्रसाठी तुम्हाला तासाभराचे तीन हजार रुपये, तर मॉडेलसोबत वेळ घालवण्याचे दोन हजार रुपये मोजावे लागतील. सर्वसामान्य व्यक्ती अवघ्या 300 ते 400 रुपयात उपलब्ध होणार आहे. 70 टक्के रक्कम ही संबंधित बॉय-फ्रेण्डला मिळेल.
नैराश्यात असलेल्या व्यक्तीला आपलं म्हणणं कोणीतरी ऐकून घ्यावं आणि आपल्याला समजून घ्यावं, इतकीच अपेक्षा असते. या अॅपच्या माध्यमातून हेच काम साध्य होईल, असा विश्वास 'RABF' टीमला वाटतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement