एक्स्प्लोर
रेनॉल्टच्या प्लस आणि स्काला कारचं उत्पादन बंद होणार?
भारतीय बाजारात रेनॉल्टच्या क्वीड कारनं आपली छाप पाडली असली तरी रेनॉल्टच्या प्लस आणि स्काला कारचं उत्पादन लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे.
मुंबई: रेनॉल्ट इंडियानं प्लस आणि स्काला या हॅचबॅक कारचं उत्पादन बंद होण्याची शक्यता आहे. रेनॉल्टनं 2012 साली या दोन्ही कार लाँच केल्या होत्या. पण या दोन्ही कारला म्हणावा तसा ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. पण अद्याप कंपनीनं या कार आपल्या वेबसाइटवरुन हटवलेल्या नाही. पण वेबसाइटवरुन त्यांच्या किंमती हटवण्यात आल्या आहेत.
स्काला कारमध्ये पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही मॉडेल उपलब्ध होते. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.5 लिटर इंजिन होतं. ज्याची पॉवर 99 पीएस होती. तर डिझेलमध्येही 1.5 लिटर इंजिन होतं. ज्याची पॉवर 86 पीएस होती. दोन्ही इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सही देण्यात आला होता.
रेनॉल्टची प्लस कार ही देखील पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होत्या. ज्यामध्ये 1.3 लिटरचं 3 सिलेंडर इंजिन होतं. तर डिझेलमध्ये 1.5 लिटर इंजिन आहे.
स्काला आणि प्लसचं उत्पादन बंद झाल्यास आता भारतात रेनॉल्टच्या क्वीड, डस्टर आणि लॉजी याच कार बाजारात उपलब्ध असतील. दरम्यान रेनॉल्ट लवकरच एक नवी कार भारतात लाँच करण्याची शक्यता आहे.
स्टोरी सौजन्य: cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement