एक्स्प्लोर

प्ले स्टोअरवरून हटवलं Remove China Apps; गूगलकडून कारण मात्र अस्पष्ट

'रिमूव्ह चायना अॅप' हे अॅप फार कमी वेळात भारतात लोकप्रिय झालं होतं. काही आठवड्यांमध्येच 50 लाखांपेक्षा जास्त वेळा हे अॅप डाऊनलोड करण्यात आलं होतं. मात्र आता गूगलने हे अॅप प्ले स्टोअरवरून हटवलं आहे.

नवी दिल्ली : भारतात सध्या चीन विरोधातील भावनांनी जोर धरला आहे. अशातच अँडॉईड फोनमधील चिनी अॅप्स ओळखून डिलीट करण्याचा दावा करणारं Remove China Apps देशभरात व्हायरल झालं आहे. परंतु, गूगल प्ले स्टोअरवरून हे अॅप हटवण्यात आलं आहे. फार कमी वेळातच हे अॅप भारतात लोकप्रिय झालं होतं. या अॅपने गूगल प्ले स्टोअरच्या टॉप फ्री अॅप्सच्या यादीत स्थान मिळवलं होतं. फक्त काही आठवड्यांमध्येच 50 लाखांपेक्षा जास्त वेळा हे अॅप डाऊनलोड करण्यात आलं होतं. तर या अॅपला 1.89 लाख रिव्ह्यू आणि 4.9 स्टार मिळाले होते. या आकडेवारीवरुन या अॅपच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल. कोरोना संकट आणि भारत-चीन सीमेवरील तणाव यासारख्या कारणांमुळे देशभरात चीनविरोधात रोष आहे.

'Remove China App' हे अॅप गेल्या महिन्यातील 17 तारखेला लॉन्च करण्यात आलं होतं. त्यानंतर भारतीयांनी या अॅपला मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली. हे अॅप देशात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होण्यासाठी अनेक कारणं आहेत. भारत-चीन सीमेवरील तणाव आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यांमुळे देशावर आलेलं संकट हे त्यातील महत्त्वाचं कारण मानलं जात आहे.

गूगलने प्ले स्टोअरवरून हटवलं 'रिमूव्ह चायना अॅप'

भारतीय नागरिकांमध्ये सध्या चीनविरोधातील भावना तीव्र झाल्या आहेत. असा दावा करण्यात येत आहे की, या अॅपच्या मदतीने टिकटॉक आणि युसी ब्राउझर यांसारखे कथित चीनी अॅप्स डिलीट केले जाऊ शकतात. दरम्यान, अॅप तयार करणाऱ्या 'वन टच अॅप लॅब्स'ने शैक्षणिक उद्देश समोर ठेवून हे अॅप तयार केले असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, अॅप डेव्हलपर्स व्यावसायिक उद्देशांसाठी हे अॅप वापरू शकत नाहीत.'

पाहा व्हिडीओ : अँड्रॉईड फोनमधील चिनी अॅप शोधणारं नवं अॅप, रिमूव्ह चायना अॅप्स कसं काम करतं?

भारतात चीनच्या विरोधात होत होता वापर

गूगलने प्ले स्टोअर वरून हे अॅप हटवलं असलं तरिही असं करण्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट केलेलं नाही. तसेच पुन्हा हे अॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध होणार की, नाही. याबाबतही गूगलने कोणतीच माहिती दिलेली नाही. जयपूरची कंपनी असलेल्या 'वन टच अॅप लॅब्स'ने आपल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, 'रिमूव्ह चायना अॅप' गूगलने प्ले स्टोअरवरून सस्पेंड केलं आहे.

Remove China Apps काय आहे?

Remove China Apps च्या निर्मित्यांचा दावा आहे की, हे अॅप शैक्षणिक उद्देशासाठी बनवलं आहे. हे अॅप अँड्रॉईड फोन युझर्सना त्यांच्या फोनमध्ये इन्स्टॉल असलेल्या अॅपचे मूळ देश कोणते हे ओळखण्यास मदत करतं. या अॅपच्या नावावरुनच स्पष्ट होतं की, फक्त चिनी कंपन्यांनी बनवलेले अॅप ओळखण्यास हे अॅप मदत करतं. रिमूव्ह चायला अॅप्सच्या मदतीने युझर्स चिनी अॅप्स अनइन्स्टॉल करु शकतात.

महत्त्वाची बाब म्हणजे, 17 मे रोजी गूगल प्ले स्टोअरवर लाईव्ह झालेलं हे अॅप आतापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त युझर्सनी डाऊनलोड केलं आहे. गुगल प्ले वर या अॅपला 4.9 रेटिंगसह बहुतांश पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले होते. OneTouch AppLabs ने या अॅपची निर्मिती केली आहे. ही जयपूरची कंपनी असून डोमेन ओनर साईट Whois नुसार याची वेबसाईट 8 मे रोजी बनवली होती. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप फ्री उपलब्ध होतं. विशेष म्हणजे, हे अॅप वापरण्यासाठी लॉगइन करण्याची गरज नव्हती. यूजर्स आपल्या अँडॉईड फोनमध्ये चिनी अॅप शोधण्यासाठी Scan चा पर्याय निवडता येत होता.

संबंधित बातम्या : 

अँड्रॉईड फोनमधील चिनी अॅप शोधणारं नवं अॅप, Remove China Apps कसं काम करतं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget