अँड्रॉईड फोनमधील चिनी अॅप शोधणारं नवं अॅप, Remove China Apps कसं काम करतं?
अँडॉईड फोनमधील चिनी अॅप्स ओळखून डिलीट करण्याचा दावा करणारं Remove China Apps देशभरात व्हायरल झालं आहे. सध्या या अॅपने गूगल प्ले स्टोअरच्या टॉप फ्री अॅप्सच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
मुंबई : अँडॉईड फोनमधील चिनी अॅप्स ओळखून डिलीट करण्याचा दावा करणारं Remove China Apps देशभरात व्हायरल झालं आहे. सध्या या अॅपने गूगल प्ले स्टोअरच्या टॉप फ्री अॅप्सच्या यादीत स्थान मिळवलं आहे. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त वेळा हे अॅप डाऊनलोड करण्यात आलं आहे. 17 मेपासून आतापर्यंत 50 लाख डाऊनलोड, या आकडेवारीवरुन या अॅपच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल. कोरोना संकट आणि भारत-चीन सीमेवरील तणाव यासारख्या कारणांमुळे देशभरात चीनविरोधात रोष आहे.
Remove China Apps काय आहे? Remove China Apps च्या निर्मित्यांचा दावा आहे की हे अॅप शैक्षणिक उद्देशासाठी बनवलं आहे. हे अॅप अँड्रॉईड फोन युझर्सना त्यांच्या फोनमध्ये इन्स्टॉल असलेल्या अॅपचे मूळ देश कोणते हे ओळखण्यास मदत करतं. या अॅपच्या नावावरुनच स्पष्ट होतं की, फक्त चिनी कंपन्यांनी बनवलेले अॅप ओळखण्यास हे अॅप मदत करतं. रिमूव्ह चायला अॅप्सच्या मदतीने युझर्स चिनी अॅप्स अनइन्स्टॉल करु शकतात.
महत्त्वाची बाब म्हणजे 17 मे रोजी गूगल प्ले स्टोअरवर लाईव्ह झालेलं हे अॅप आतापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त युझर्सनी डाऊनलोड केलं आहे. गुगल प्ले वर या अॅपला 4.9 रेटिंगसह बहुतांश पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले आहेत. OneTouch AppLabs ने या अॅपची निर्मिती केली आहे. ही जयपूरची कंपनी असून डोमेन ओनर साईट Whois नुसार याची वेबसाईट 8 मे रोजी बनवली होती. गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप फ्री आहे. विशेष म्हणजे हे अॅप वापरण्यासाठी लॉगइन करण्याची गरज नाही. यूजर्स आपल्या अँडॉईड फोनमध्ये चिनी अॅप शोधण्यासाठी Scan चा पर्याय निवडू शकतात.
फोनमधून चिनी अॅप कसे डिलीट कराल? - गूगल प्ले स्टोअरमधून 'Remove China Apps' डाऊनलोड आणि इन्स्टॉल करा - 'Remove China Apps' ओपन करा - आता 'Scan Now' पर टॅप करा आणि तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये असलेले चिनी अॅप शोधा - यानंतर हे अॅप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल अॅप स्कॅन करेल. जर चिनी अॅप मोबाईलमध्ये असतील तर त्याची यादी बनवले. - यानंतर जर तुम्हाला या यादीतील कोणतं अॅप डिलीट करायचं असेल तर अॅपच्या समोरील डिलीट पर्यायावर टॅप करा - मग 'Remove China Apps' तुमच्या फोनमधील ते अॅप डिलिट करेल.