एक्स्प्लोर
Advertisement
आयडिया-व्होडाफोन एकत्र, जिओचं दोघांनाही उत्तर, एअरटेलचीही उडी
ट्विटरवर आयडिया-व्होडाफोन आणि त्यांना जिओने दिलेल्या रिप्लायने एकच ट्विटरवॉर रंगलं. यामध्ये एअरटेलनेही नंतर उडी घेतली.
मुंबई : आयडिया आणि व्होडाफोन यांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासोबतच ही देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरली आहे, जिची ग्राहकसंख्या 40.8 कोटी एवढी आहे. आतापर्यंत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एअरटेललाही आयडिया-व्होडाफोनने मागे टाकलं.
या विलिनीकरणानंतर ट्विटरवर आयडिया, व्होडाफोन आणि रिलायन्स जिओ यांच्यात चांगलंच ट्विटरवॉर रंगलं. ज्यात नंतर एअरटेलनेही उडी घेतली.
आयडियाने व्होडाफोनला टॅग करुन मजेशीर ट्विट केलं, की “व्होडाफोन, ते सगळे आपल्याविषयी बोलतायत”.
व्होडाफोनने याला लगेच रिप्लाय दिला, “हो आयडिया, आता आपण अधिकृतपणेच जाहीर केलंय”Hey, @VodafoneIN you know they're all talking about us.
— Idea (@Idea) August 31, 2018
आयडिया आणि व्होडाफोनच्या या रिप्लायला ग्राहक मजेशीर उत्तरं देत होते. तेवढ्यातच सर्व दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या रिलायन्स जिओनेही यात उडी घेतली आणि दोन्ही कंपन्यांना रिप्लाय दिला. “आम्ही 2016 पासून लोकांना एकत्र आणतोय” असं उत्तर जिओने दिलं.Yeah @Idea. It's time we made it official.???????? https://t.co/CO5qmSypUc https://t.co/Rvpvn28qYb
— Vodafone (@VodafoneIN) August 31, 2018
आयडिया-व्होडाफोनला जिओने दिलेल्या उत्तरावर युझर्स मजा घेत होते, त्यातच एअरटेलनेही यात उडी घेतली. “तुमचा मोबाईल नंबर एअरटेलमध्ये पोर्ट करुन आम्हाला जॉईन करा,” असं ट्वीट करत एअरटेलने एमएनपीची लिंक दिली.Bringing people together since 2016. ❤️@VodafoneIN @Idea #WithLoveFromJio https://t.co/A7iDw6awvK
— Reliance Jio (@reliancejio) August 31, 2018
Hey, we’re delighted to hear you want to join our family! Let's head over to: https://t.co/fMmLwDyt5J to know more information about the process and I'll still be here if you need anything further. Thank you, Devrishi
— Bharti Airtel India (@Airtel_Presence) August 31, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
बातम्या
Advertisement