एक्स्प्लोर
शाओमीच्या या लोकप्रिय फोनच्या किंमतीत वाढ
या फोनचं 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जन, जे 13 हजार 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आलं होतं, त्यासाठी आता 14 हजार 999 रुपये मोजावे लागतील.
मुंबई : शाओमीचा रेडमी नोट 5 प्रो हा फोन खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी आहे. या फोनची किंमत वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या फोनचं 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज व्हर्जन, जे 13 हजार 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आलं होतं, त्यासाठी आता 14 हजार 999 रुपये मोजावे लागतील.
नवी किंमत 1 मेपासून लागू होणार आहे. याशिवाय 55 इंचच्या Mi टीव्ही 4 च्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. हा टीव्ही 39 हजार 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, जो 1 मेपासून 44 हजार 999 रुपयांना मिळेल.
किंमत वाढवण्याचं कारण काय?
शाओमीने ही किंमत वाढवण्यामागचं कारणही सांगितलं आहे. PCBA इंपोर्ट ड्युटीत झालेले बदल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचं मूल्य घसरल्यामुळे ही वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, रेडमी नोट 5 प्रो 6GB रॅम व्हेरिएंटच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
फेब्रुवारीत ‘रेडमी नोट 5 प्रो’ स्मार्टफोनचे एकूण दोन व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले होते. यामध्ये 13 हजार 999 रुपये किंमतीचा 4 जीबी व्हेरिएंट आणि 16 हजार 999 रुपये किंमतीचा 6 जीबी व्हेरिएंट अशा दोन व्हेरिएंटचा समावेश आहे.
‘रेडमी नोट 5 प्रो’चे निवडक फीचर्स :
5.9 इंच एचडी स्क्रीन (1080×2160 पिक्सेल रिझॉल्युशन)
ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट
12 मेगापिक्सेल आणि 5 मेगापिक्सेलचे दोन रिअर कॅमेरे
ब्युटिफाय 4.0, पोट्रेट मोडचेही कॅमेरात फीचर्स
20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
4000 mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement