एक्स्प्लोर

Redmi Note 11, 11s Launch: : Redmi ची नवी सीरीज भारतात लॉंच, जाणून घ्या नव्या फिचर्सबाबत

Redmi Note 11 आणि Redmi Note 11S स्मार्टफोन आज भारतात लॉन्च झाले आहेत.

Redmi Note 11, 11s Launch: : Redmi Note 11 आणि Redmi Note 11S स्मार्टफोन आज भारतात लॉन्च झाले आहेत. नवीन Redmi Note मॉडेल्स जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल झाले. Redmi Note 11 आणि Redmi Note 11S या दोन्हींमध्ये 90Hz AMOLED डिस्प्ले आणि क्वाड रियर कॅमेरे आहेत. Redmi Note 11 सिरीजसोबत, Xiaomi सब-ब्रँडने  Redmi Smart Band Pro आणि Redmi TV X43 लाँच केल्याचे स्पष्ट केले आहे. रेडमी स्मार्ट बँड प्रो, रेडमी स्मार्ट बँडमध्ये विविध नवी फिचर्स उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे, Redmi TV X43 मध्ये डॉल्बी व्हिजन आणि 4K HDR पॅनेलसह विविध फिचर्स उपलब्ध आहेत

Redmi Note 11 सिरीज भारतात लाँच
Xiaomi सब-ब्रँड Redmi आज Redmi Note 11 आणि Redmi Note 11S चे व्हर्च्युअल लॉन्च करण्यात आला. हा कार्यक्रम Redmi India सोशल मीडियाच्या माध्यामातून थेट प्रसारित करण्यात आला, ज्यामध्ये Facebook, Twitter आणि YouTube या माध्यमांचा समावेश होता. Redmi Note 11 ची भारतातील किंमत 13,999 ते 14,999 रुपयांपासून सुरू होते. तर Redmi Note 11S ची सुरुवात 16,999 ते 17,499 रुपयांपर्यंत सुरू होते. तर Redmi Note 11S बेस 6GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटसाठी 17,999 आणि 6GB + 128GB मॉडेलसाठी 19,999 रुपये किंमत सांगितली जातेय. Redmi Note 11 आणि  Redmi Note 11S ची किंमत लॉन्चिंग दरम्यान घोषित करण्यात आले आहे.

Redmi Note 11, Redmi Note 11S चे फिचर्स
Redmi Note 11 सीरीजच्या अनावरणा दरम्यान Redmi Note 11 आणि Redmi Note 11S चे फिचर्स सांगितले आहेत. दरम्यान दोन्ही मॉडेल्सच्या प्रकारांमध्ये फिचर्समध्ये जास्त फरक नसल्याचे आढळले आहे. Redmi Note 11 आणि Redmi Note 11S दोन्ही Android 11 वर MIUI 13 वर चालतात आणि 6.43 इंच फुल एचडी+ (1,080x2,400 पिक्सेल) AMOLED डॉट डिस्प्ले असे फिचर्स आहेत. Redmi Note 11 मध्ये Qualcomm Snapdragon 680 SoC आहे, तर Redmi Note 11S मध्ये MediaTek Helio G96 SoC आहे. Redmi Note 11 मध्ये 6GB पर्यंत RAM आहे, तर Redmi Note 11S मध्ये 8GB पर्यंत RAM चा सपोर्ट आहे. Redmi Note 11 क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरचा समावेश आहे. Redmi Note 11S मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप तसेच 108 मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, Redmi Note 11 समोर 13-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सरसह येतो. दुसरीकडे, Redmi Note 11S, 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देते. Redmi Note 11 आणि Redmi Note 11S या दोन्हींमध्ये 128GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज आणि 5,000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 33W प्रो फास्ट चार्जिंग देखील समाविष्ट आहे.

Redmi Smart Band Pro, Redmi Smart TV X43 माहिती
नोव्हेंबरमध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आलेला Redmi स्मार्ट बँड प्रो मोठ्या 1.47-इंच AMOLED ऑन डिस्प्ले आणि 110 पेक्षा जास्त वर्कआउट मोडसह येतो. फिटनेस बँड असलेले गॅजेट ऑक्सिजन पातळी (SpO2) मॉनिटरिंग करते, तसेच मानवाची हृदय गती ट्रॅकिंग करतो. रेडमी स्मार्ट बँड प्रो देखील वॉटर- रेसिस्टंट बिल्डमध्ये येतो आणि 20 दिवसांपर्यंत वापरण्यावर रेट केला जातो. दुसरीकडे, Redmi Smart TV X43 मध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्टसह 43-इंचाचा 4K HDR पॅनेल आहे. स्मार्ट टीव्ही 30W स्पीकर आणि डॉल्बी ऑडिओ वापरून शांत आवाजाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
Embed widget