(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Apple MacBook Pro : Apple MacBook Pro ची प्री-बुकिंग 17 जूनपासून सुरू; M2 चिप असलेल्या या लॅपटॉपची खासियत जाणून घ्या
MacBook Pro Pre Order : Apple ने जाहीर केले आहे की, 13-इंच आणि M2 चिप MacBook Pro 17 जूनपासून प्री-बुक करता येईल.
MacBook Pro Pre Booking : Apple ने गेल्या आठवड्यात WWDC च्या वार्षिक कार्यक्रमात M2 चिपसह नवीन 13-इंचाचा MacBook Pro लॉन्च केला. आता कंपनीने घोषणा केली आहे की 13-इंचाचा MacBook Pro 17 जूनपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. या वर्षी 2022 मध्ये Apple ने M2 चिप आणि दोन मॅकबुक लाँच केले आहेत. यात मॅकबुक एअर आणि 13-इंचाचा मॅकबुक प्रो आहे. मॅकबुक एअरमध्ये 13.6-इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे, जो 1080p HD कॅमेरासह येतो.
MacBook Pro ची किंमत
256 GB स्टोरेजसाठी M2 प्रोसेसरसह MacBook Pro ची सुरुवातीची किंमत 1,29,900 रुपये आहे. त्याच्या 512 GB स्टोअर केलेल्या MacBook Pro ची सुरुवातीची किंमत 1,49,900 रुपये आहे.
MacBook Pro वर ऑफर
कंपनी MacBook Pro वर नो-कॉस्ट EMI पेमेंट पर्याय ऑफर करत आहे, जो 6 महिन्यांसाठी दिला जात आहे. विशेष बाब म्हणजे, M2 चिप असलेला MacBook Pro 13 'Education' ग्राहकांना केवळ 1,19,900 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे.
MacBook Pro ची बॅटरी
MacBook Pro मध्ये 24 GB युनिफाइड मेमरी देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला ProRes एक्सीलरेशन आणि 20 तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळेल. Apple ने MacBook Pro लॅपटॉपमध्ये 13 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. M2 MacBook Pro अधिक चांगल्या मल्टी-टास्किंगसाठी 24GB पर्यंत युनिफाइड मेमरीला अनुमती देते. MacBook Pro ProRes एन्कोड आणि डीकोडसाठी समर्थन देते, ज्यामुळे वापरकर्त्यांना 4K च्या 11 स्ट्रीम आणि 8K ProRes व्हिडिओच्या दोन स्ट्रीमपर्यंत चालवता येते.
दहावीचा बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर असा पाहा निकाल
यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी MH10.ABPMajha.Com या लिंकवर क्लिक करा.
महत्वाच्या बातम्या :