एक्स्प्लोर

Internet Explorer : 15 जूनपासून इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार, 27 वर्षांचा प्रवास संपणार

Internet Explorer : इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) हे वेब ब्राऊझर (Web Browser) 15 जून 2022 पासून बंद होणार आहे. त्याऐवजी आता मायक्रोसॉफ्ट एज् (Microsoft Edge) येणार आहे.

Internet Explorer : मागील दोन दशकांहून अधिक काळ सेवा देणारं इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) हे वेब ब्राऊझर (Web Browser) 15 जून 2022 पासून बंद होणार आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीन (Microsoft) हे वेब ब्राऊझर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच बुधवारपासून इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार आहे. इंटरनेट एक्सप्लोरर गेली 27 वर्ष जगभरातील नेटकऱ्यांचा एक भाग बनला होता. 1995 मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राऊझर सुरु करण्यात आलं होतं.

मायक्रोसॉफ्ट कंपनीनं कम्प्यूचर ऑपरेटिंग सिस्टम Windows 95 साठी अॅड-ऑन पॅकेज म्हणून इंटरनेट एक्सप्लोरर सुरु केलं. नंतर कंपनीने या पॅकेजअंतर्गत हे ब्राउझर मोफत देण्यास सुरुवात केली. एकेकाळी इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राऊझर अत्यंत लोकप्रिय होतं. 2000 सालानंतर त्याच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्यानं वाढली. 2003 मध्ये या वेब ब्राउझर मार्केट शेअर जवळपास 95 टक्क्यांपर्यंत वाढला होता आणि जगभरातील जवळजवळ प्रत्येकजण इंटरनेट एक्सप्लोरर वापरत होता. पुढे गुगल क्रोम, फायरफॉक्स असे ब्राउझर बाजारात आले. त्यांच्या तुलनेत इंटरनेट एक्सप्लोरर स्वतःला अपडेट करू शकला नाही आणि बाजारात मागे पडला. हळूहळू लोकांनी इंटरनेट एक्सप्लोरर वापरणं बंद केलं.

आता 15 जून रोजी इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार असून त्याची जागा मायक्रोसॉफ्ट एज् (Microsoft Edge) घेणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्ट कंपनीनं केली आहे. 

Microsoft Edge मध्ये मिळणार Internet Explorer ची सेवा 

इंटरनेट एक्सप्लोररची सेवा मायक्रोसॉफ्ट एजमध्ये उपलब्ध असेल. मायक्रोसॉफ्ट कंपनीनं सांगितलं आहे की, विंडोज 10 वरील इंटरनेट एक्सप्लोरर सेवा आता मायक्रोसॉफ्ट एजमध्ये उपलब्ध असेल. मायक्रोसॉफ्ट एज हा इंटरनेट एक्सप्लोररपेक्षा वेगवान, अधिक सुरक्षित आणि आधुनिक ब्राउझर आहे. मायक्रोसॉफ्टने 2016 मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर वेब ब्राउझर अपडेट करणं बंद केलं. मायक्रोसॉफ्टने इंटरनेट एक्सप्लोरर बंद करण्याचा निर्णय घेतला. मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयाचा लोकांवर फारसा परिणाम होणार नाही कारण बहुतेक लोक आधीच इतर वेब ब्राउझर वापरत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Pawar on Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंनी मांडलेल्या हक्कभंगावर रोहित पवारांचं निवेदनABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 8PM 25 March 2025Job Majha : NMDC स्टील लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 25 March 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 7PM 25 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Embed widget