(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pegasus Spyware : सावधान! तुमच्या व्हॉट्सअॅपलासुद्धा हॅक करू शकते Pegasus Spyware,हे प्रकरण नेमकं काय ते जाणून घ्या
How Pegasus Work : Pegasus Spyware वरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या या पेगाससमध्ये नेमकं काय आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
What is Pegasus Spyware : नुकताच एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, पेगासस स्पायवेअर (Pegasus Spyware) भारत सरकारला शस्त्रास्त्रांच्या डीलद्वारे विकले गेले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता विरोधकच आक्रमक झाले आहेत. मागच्या वर्षी 2021 मध्ये देखील पेगासस स्पायवेअरबद्दल बरेच खुलासे झाले होते. त्यावेळी या माध्यमातून अनेक विरोधी पक्षनेते, पत्रकार, कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याची चर्चा होती. हे स्पायवेअर इतके धोकादायक आहे की याद्वारे व्हॉट्सअॅप देखील हॅक केले जाऊ शकते. पेगासस स्पायवेअरमध्ये असं नेमकं काय आहे आणि ते कसं फंक्शन करते ते जाणून घ्या.
पेगासस (Pegasus Spyware) समजून घ्या
पेगासस हे एक गुप्तचर सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर इस्रायली कंपनी एनएसओ ग्रुपने बनवले आहे. हे टार्गेट व्यक्तीच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर माहिती न देता इन्स्टॉल केले जाते. त्यानंतर हा स्पायवेअर त्या व्यक्तीवर नजर ठेवू लागतो. हे सॉफ्टवेअर त्याच्या डिव्हाईसमधून वैयक्तिक डेटा चोरण्यास सुरुवात करते. इतकंच नाही तर, ते थर्ड पार्टीला डेटाही डिलिव्हर करते. हे स्पायवेअर बनविण्यामागचा उद्देश दहशतवादी आणि गुन्हेगारांवर नजर ठेवण्याचा होता.
अशा प्रकारे होतो इन्टॉल
तज्ज्ञांच्या मते, पेगासस स्पायवेअर हे व्हॉट्सअॅप मिस्ड कॉलद्वारे सर्वात सहजपणे इन्स्टॉल केले जाते. याशिवाय, iMessage च्या सुरक्षेच्या कमतरतेचा फायदा घेऊन ते आयफोनमध्ये इन्स्टॉल केले जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे स्पायवेअर इतके धोकादायक आहे की, त्यात शून्य क्लिक पद्धत वापरली जाते. म्हणजेच, कोणत्याही लिंकवर क्लिक न करताही ते तुमच्या डिव्हाईसमध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकते.
काय-काय हॅक होऊ शकते?
एकदा तुमच्या डिव्हाईसवर इन्स्टॉल झाल्यानंतर, पेगासस तुमचा सर्व डेटा जसे की मजकूर संदेश, ईमेल, संपर्क, फोटो हॅक करतो आणि इतर पार्टीला पाठवतो. याचबरोबर तुमची वैयक्तिक माहितीही लीक केली जाते. एवढेच नाही, तर ते तुमच्या डिव्हाईसचा माईक आणि कॅमेरा आपोआप सुरू करू शकते. याच्या मदतीने ते तुमच्या लोकेशनचे फोटो आणि अचानक आलेला कोणताही ऑडिओ रेकॉर्ड करू शकते.
यामुळे सर्वात मोठा धोका आहे
खरंतर पेगासस स्पायवेअर कोणताही डेटा अगदी साध्या पद्धतीने हॅक करू शकतो. सोशल मीडियात व्हॉट्सअॅपचा वापर जास्त होत असल्याने व्हॉट्सअॅप चॅट लीक होणे धोकादायक ठरू शकते.
महत्वाच्या बातम्या :
- iPhone : मास्क घातल्यानंतही फेस आयडी वापरून आयफोन करा अनलॉक; काय आहे अॅपलचं नवं फिचर
- WhatsApp New Feature : आता वाढणार ग्रुप अॅडमिनची ताकद, तुम्हाला पाहिजे तेव्हा ग्रुपमधून कोणताही मेसेज डिलीट करू शकता
- What is Metaverse: ‘मेटाव्हर्स’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपल्या आयुष्यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha