What is Metaverse: ‘मेटाव्हर्स’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपल्या आयुष्यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो
New Digital World: मेटाव्हर्सबाबत अनेक गोष्टी आपल्या कानावर पडत आहेत. याबाबत कित्येकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतील.
New Digital World: जेव्हा फेसबुकनं गेल्या वर्षी त्याचं नाव मेटा असं बदललं. त्यावेळी फेसबुकनं त्यांचं संपूर्ण लक्ष मेटाव्हर्स तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करायचे आहे, असं सांगितलं होतं. मेटाव्हर्सबाबत अनेक गोष्टी आपल्या कानावर पडत आहेत. याबाबत कित्येकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतील. मेटाव्हर्स काय आहे? ते कसं कार्य करते? फेसबूकचं संपूर्ण लक्ष मेटाव्हर्सवर का आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
मेटाव्हर्स हा शब्द ऐकायला खूपच वेगळा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर मेटाव्हर्स हे एक प्रकारचे आभासी जग आहे. या तंत्रानं तुम्ही आभासी ओळखीद्वारे डिजिटल जगात प्रवेश करू शकतात. हे एक वेगळं जग असून येथे तुमची वेगळी ओळख असेल. या डिजीटल जगात, तुम्हाला फिरण्याची, खरेदी करण्याची आणि मित्रांना भेटण्याची संधी देखील मिळते. मेटाव्हर्स ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या अनेक तंत्रज्ञानाची जोड देऊन कार्य करते.
मेटाव्हर्स ही संकल्पना नवीन नाही. याची रचना तीन दशकांपूर्वी 1992 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकन सायन्स फिक्शन लेखक निया स्टीफन्सन यांनी त्यांच्या 'स्नो क्रश' या कादंबरीत मेटाव्हर्सचे वर्णन केलं होतं. या तीस वर्षांत हळूहळू या तंत्रज्ञानात उद्योगानं प्रगती केली. मेटाव्हर्सवर काम करणारी फेसबुक ही पहिली कंपनी नाही. फेसबुकच्या आधी, स्टार्टअप डेसेंट्रालँडनं 2017 मध्ये या संकल्पनेवर काम केलं होतं. त्याची वेबसाइट https://decentraland.org/ आहे. इथे तुम्हाला एक वेगळंच आभासी जग पाहायला मिळेल. या जगाचे स्वतःचे चलन, अर्थव्यवस्था आणि जमीन आहे.
सध्या काहीच लोक मेटाव्हर्स वापरता येत आहे. लवकरच सर्वांना मेटाव्हर्स वापरता येईल, अशी अपेक्षा केली जात आहे. ज्यामुळं प्रत्येकाला नव्या जगाचा अनुभव घेता येईल. या द्वारे तुम्हाला अभासी जगात प्रवेश करता येणार आहे. जर, तुम्हला व्हर्च्युअल टूर दरम्यान वाटेत शोरूम दिसल्यास तुम्ही तिथे खेरदी देखील करू शकता. येथे खरेदी केलेली वस्तु प्रत्यक्षात तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल.
- हे देखील वाचा-
- Airtel Google : एअरटेलचा धमाका; भारतात स्वस्त स्मार्टफोन तयार करणार, गुगलची मोठी गुंतवणूक
- Youtube Shorts मधून दर महिन्याला मिळणार 7.5 लाख रुपये कमावण्याची संधी, या पद्धती फॉलो करा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha