iPhone : मास्क घातल्यानंतही फेस आयडी वापरून आयफोन करा अनलॉक; काय आहे अॅपलचं नवं फिचर
या फिचरमध्ये फेस आयडी मास्कसह आणि अॅपल स्मार्ट वॉचचा (Apple Smart Watch) वापर न करता आयफोन हा फेस आडीचा वापर करून अनलॉक करता येणार आहे.
iPhone : आयफोनमध्ये (iPhone) नेहमी वेगवेगळे फिरचर्स अॅड होत असतात. Apple ही कंपनी एका नव्या फिचरवर सध्या काम करत आहे, अशी चर्चा आहे. हे नवे फिचर असे आहे की, यूझरनं मास्क लावला असला तरी तो त्याचा फेस आयडीवरून फोन अनलॉक करू शकतो. MacRumors नुसार, iOS 15.4 बीटाने नवे फिचर डिझाइन केलं आहे. या फिचरमध्ये मास्क घालून आणि अॅपल स्मार्ट वॉचचा (Apple Smart Watch) वापर न करता आयफोन हा फेस आडीचा वापर करून अनलॉक करता येणार आहे.
मास्कचा वापर करून फेस आयडीने फोन अनलॉक करण्याचे हे फिचर जर यूझरला वापरायचे असेल तर त्याच्याकडे केवळ आयफोन 12 किंवा आयफोन 13 हे फोनचे मॉडेल असणे आवश्यक आहे, कारण सध्या आयफोन 11 या फोनमध्ये हे फिचर यूझरला उपलब्ध करून देण्याचा निर्णय अजून कंपनीनं घेतलेला नाही. अॅपलने यापूर्वी फेस आयडी मास्कसह "कंम्पेटिबल" केला होता. मात्र यासाठी अॅपल कंपनीचे वॉच वापरणे आवश्यक होते.
iOS 15.4 बीटा ज्या नव्या फिचरवर काम करत आहे, त्या फिचरनुसार मास्क घालून देखील तुम्ही फेस आयडीचा वापर करून फोन अनलॉक करू शकता. या फिचरमध्ये तुम्हाला अॅपल वॉच वापरण्याची गरज नाही. तसेच मास्क घालून तुम्ही फेस आयडीचा वापर करून अॅपल पे, अॅपल स्टोअर डाऊनलोड आणि थर्ड पार्टी अॅप्स या सर्व फोनमधील अॅप्सचा वापर करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
- अमेरिकेतील विमानतळावर सुरू झालेल्या 5जी सेवेचा विमानांच्या लँडिंगला अडथळा
- Apple Watch Hidden Feature : Apple 'स्मार्ट'वॉच, स्क्रिनशॉटही काढता येतो!
- 5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha