Zero Hour Priyanka Chaturvedi : इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे कुणाच्या बाजूने?
महाराष्ट्रातून आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता पुन्हा एकदा गेस्ट सेंटरला जावूयात..
इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर सुरु झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आपण संवाद साधूयात ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी.
१. महाराष्ट्राच्या निकालानंतर इंडिया आघाडीत हालचालींना वेग आलाय... नेतृत्व बदलाचीही चर्चा सुरु झालीय... खंबीर चेहरा म्हणून तुमची पहिली पसंती कोणाला असेल आणि काही स्पेसिफिक कारणं?
२. ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचं नेतृत्व करावं अशी मागणी जवळपास सगळ्याच मित्रपक्षांकडून होतेय... त्यावर तुमची भूमिका?
३. ममतांना नेतृत्व म्हणजे काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्ह... अशानं आघाडीत संघर्ष होईल असं वाटतं का?
४. काँग्रेसकडून आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर हेच दिसतंय की काँग्रेस इंडिया आघाडीचं नेतृत्व सोडायाला काही तयार नाही.. त्यावेळी अन्य पर्याय काय आहेत..?
५. उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेससोबत की तृणमूलचं नेतृत्व मान्य करणार? तुमच्या सकाळच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी तुमच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय की, तुमच्या मताला पक्षात काय किंमत आहे?
६. ममतांनी इंडियात असतानाही पश्चिम बंगालमध्ये विधानसभा स्वबळावर लढवली होती.. दिल्लीत केजरीवालांनीही स्वबळांची घोषणा केलीय.. तुम्ही मात्र राज्यात एकत्रच लढलात... पण, आता मुंबईसह प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत.. तिथं ठाकरेंची स्वबळाची भूमिका असेल का?