गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा Paytm आलं, का हटवलं होतं पेटीएम?
Google Play Store वर Paytm पुन्हा डाऊनलोड करु शकता. कंपनीनं स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. गूगल प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवण्यात आलं होतं पॉलिसी उल्लंघनाचे कारण देत गुगलने प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवलं होतं.
मुंबई : गूगल प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवण्यात आलं होतं पॉलिसी उल्लंघनाचे कारण देत गुगलने प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवलं होतं. स्पोर्ट्स सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्या अॅप्सना परवानगी देत नाही आणि असे अॅप्स गुगल प्ले स्टोअर वरून काढले जातील, असं गूगलने म्हटलं आहे.
Google Play Store वर Paytm पुन्हा डाऊनलोड करु शकता. कंपनीनं स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पेटीएमचे फाऊंडर विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करत लोकांचे आभार मानले आहेत. गूगल प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवण्यात आलं होतं. पॉलिसी उल्लंघनाचे कारण देत गुगलने प्ले स्टोअरवरून पेटीएम अॅप हटवलं आहे. स्पोर्ट्स सट्टेबाजीला प्रोत्साहन देणार्या अॅप्सना परवानगी देत नाही आणि असे अॅप्स गुगल प्ले स्टोअर वरून काढले जातील, असं गूगलने म्हटलं होतं.
गूगलच्या निर्णयानंतर पेटीएमने ट्वीट केलं होतं की, “गुगलच्या प्ले स्टोअरवर Paytm Android App नवीन डाऊनलोड्स किंवा अपडेटसाठी तात्पुरते उपलब्ध नाही. लवकरच ते पुन्हा उपलब्ध केले जाईल. आपले सर्व पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि आपण नेहमीप्रमाणे पेटीएम अॅप सुरू ठेऊ शकता.गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं होतं की, "आम्ही ऑनलाईन कसिनोला परवानगी देत नाही किंवा क्रीडा सट्टेबाजीला सुलभ करू शकणार्या कोणत्याही अनियमित अॅपला मान्यता देत नाही. यामध्ये ते अॅप्स समाविष्ट आहेत जे ग्राहकांना बाह्य वेबसाईटला भेट देण्यासाठी प्रोत्साहित करतात. जे पैसे घेऊन खेळात पैसे किंवा रोख बक्षिसे मिळविण्याची संधी देतात, हे आमच्या धोरणांचे उल्लंघन आहे." भारतात आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धा सुरु होण्याआधी असे अॅप्स मोठ्या प्रमाणात लॉन्च केले जातात. इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) तेरावा सीजन युएईमध्ये आज, 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गूगलने हे मोठं पाऊल उचललं होतं.Thanks everyone for your support! Paytm App is back, live in Play Store. 🙏🏼 We launched a UPI CashBack campaign this morning. Our app got suspended by Google for this. India, you decide if giving cash back is gambling. 🇮🇳 pic.twitter.com/w5Rcrs6lLT
— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) September 18, 2020