OPPO Reno 7 Series Launch : Oppo यूजर्ससाठी गुड न्यूज! 'या' तारखेला होणार Reno7 Series लॉन्च
OPPO Reno 7 Features : हँडसेटच्या मागील बाजूस ट्विन मून कॅमेरा डिझाइन असेल. कॅमेरा मॉड्यूलचा वरचा अर्धा भाग मेटलचा असेल, तर खालचा अर्धा भाग सिरॅमिक कोटिडचा असेल.
OPPO Reno 7 Price : तुम्ही जर OPPO या स्मार्टफोन ब्रॅंडचे फॅन्स असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. नुकतंच Oppo ने भारतात त्यांचं नवीन मॉडेल Reno 7 सीरीजच्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. कंपनी 4 फेब्रुवारीला मोबाईलची लॉन्चिंग करणार आहे. या सिरिजमध्ये Oppo Reno 7आणि Oppo Reno 7 Pro यांचा समावेश असेल. दोन्ही हँडसेट 5G सपोर्टचे असतील. एका इव्हेंटमध्ये Oppo स्मार्टफोन मालकीच्या Oppo Glo डिझाईनसह येत असल्याचे सांगितले आहे. या मोबाईलच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या...
Oppo Reno7 Pro 5G आणि Reno7 5G स्टारलाईट ब्लू आणि स्टारलाईट ब्लॅक या दोन कलरमध्ये उपलब्ध असतील. Oppo Reno 7 Pro 2.5D 6.55 इंच OLED स्क्रीनचा असेल. स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूची साईड 0.2 मिमी आहे. Reno 7 Pro मागील सिरिजच्या Reno पेक्षा 11.5% स्लिम असेल. 92.8% अल्ट्रा-लार्ज स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि वजन 180 ग्रॅम असेल. Oppo कंपनीने असं म्हटलं आहे की हा आतापर्यंतचा सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे.
यामध्ये हँडसेटच्या मागच्या बाजूस ट्विन मून कॅमेरा डिझाईन असेल. कॅमेरा मॉड्यूलचा वरचा अर्धा भाग मेटलचा असेल, तर खालचा अर्धा भाग सिरॅमिक कोटिडचा असेल. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये 32MP Sony IMX709 चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
Oppo Reno7 सिरीज गेल्या वर्षी चीनमध्ये लॉन्च करण्यात आली होती. Oppo Reno7 मध्ये 6.43-इंचाचा AMOLED FHD+ डिस्प्ले आहे. तर Reno 7 Pro मध्ये 6.55-इंचाची FHD+ AMOLED स्क्रीन आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Discount on Galaxy Z Flip 3 : सॅमसंगच्या या मोबाईलवर मिळतेय बंपर ऑफर, जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही...
- अमेरिकेतील विमानतळावर सुरू झालेल्या 5जी सेवेचा विमानांच्या लँडिंगला अडथळा
- पुढल्या वर्षी देशातल्या प्रमुख शहरांना 5G नेटवर्कचं गिफ्ट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha