Discount on Galaxy Z Flip 3 : सॅमसंगच्या या मोबाईलवर मिळतेय बंपर ऑफर, जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही...
Samsung Galaxy Z Flip 3 : सॅमसंगने आपल्या प्रीमियम स्मार्टफोन Galaxy Z Flip 3 वर खास ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्ही 84,999 रुपयांचा हा मोबाईल 64,099 रुपयांपर्यंतच्या किंमतीत खरेदी करू शकता.
Samsung Galaxy Z Flip 3 Offer : जर तुम्ही सॅमसंगचा Galaxy Z Flip 3 मोबाईल घेण्याचा विचार करत आहात. परंतु, जास्त किंमतीमुळे तुम्ही तो आतापर्यंत घेतला नसेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. सॅमसंगचा हा प्रीमियम फोन त्याच्या खऱ्या किंमतीपेक्षा चक्क 20 हजारांच्या डिस्काऊंटमध्ये मिळतोय. या मोबाईलच्या खऱ्या किंमतीला ऑफरमध्ये खूपच कमी करण्यात आले आहे. जाणून घ्या या मोबाईलची किंमत, फीचर्स आणि बरंच काही...
ही आहे ऑफर
ऑनलाइन शॉपिंग साईटवर या स्मार्टफोनची खरी किंमत जवळपास 84,999 रुपये आहे. हा मोबाईल खरेदी करण्यासाठी तुम्ही HDFC बँकेच्या कार्डने पैसे भरल्यास तुम्हाला 7 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल. म्हणजेच 84,999 रुपयांच्या फोनची किंमत 77,999 रुपये असेल. तुम्हाला यामध्ये एक्सचेंज बोनस देखील मिळेल. कोणताही जुना मोबाईल देऊन तुम्ही 13,900 रुपयांपर्यंत सूटदेखील मिळवू शकता. अशाप्रकारे, अनेक डिस्काऊंटसह हा मोाबाईल तुम्हाला 64,099 रूपयांपर्यंत मिळू शकतो. अर्थात, एक्सचेंज ऑफरसाठी तुमचा मोबाईलदेखील चांगला आणि महाग असणं गरजेचं आहे. जर तुम्ही आयफोन (iPhone )12 देऊन हा मोबाईल घेतला तर तुम्हाला 13,900 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
काय खास आहे या मोबाईलमध्ये
या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा डायनॅमिक एमोलेड मेन डिस्प्ले मिळेल. याशिवाय, यामध्ये 1.9-इंचाचा सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले देखील आहे. कंपनीने दोन्ही डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टरचे प्रोटेक्शन दिले आहे.
फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स
सॅमसंगच्या या खास फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हे Android-11 ऑपरेटिंग सिस्टमवर देखील चालेल. कंपनीचा असा दावा आहे की डॉल्बी स्टीरिओ स्पीकर्ससह येणाऱ्या या मोबाईलमध्ये IPX8 वॉटर रेसिस्टंट फीचर देण्यात आले आहे. या मोबाईलमध्ये एक नॅनो सिम आणि दुसरी ई-सिम सुविधादेखील देण्यात आली आहे. 15W फास्ट चार्जिंगच्या व्यतिरिक्त, मोबाईलमध्ये 10W वायरलेस चार्जिंग फीचर देखील समाविष्ट आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- अमेरिकेतील विमानतळावर सुरू झालेल्या 5जी सेवेचा विमानांच्या लँडिंगला अडथळा
- पुढल्या वर्षी देशातल्या प्रमुख शहरांना 5G नेटवर्कचं गिफ्ट!
- 5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha