एक्स्प्लोर
तब्बल 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, ओपो F5 यूथ एडिशन स्मार्टफोन लाँच
या नव्या एडिशनमधील कॅमेरा सेटअपचा विचार केल्यास यामध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट आणि 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
मुंबई : ओपोने आपला नवा स्मार्टफोन ओपो F5चं नवं व्हर्जन लाँच केलं आहे. ओपो F5 यूथ एडिशनची किंमत जवळजवळ 17,835 रुपये आहे. कंपनीनं हा फोन सध्या फिलीपाईन्समध्ये लाँच केला आहे.
लूकच्या बाबतीत हा स्मार्टफोन ओपो F5पेक्षा वेगळा नाही. पण याच्या फीचरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये 6 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. याचं रेझ्युलेशन 2160x1080 आहे. यामध्ये मीडियाटेक Helio P23 प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम देण्यात आली आहे.
या नव्या एडिशनमधील कॅमेरा सेटअपचा विचार केल्यास यामध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट आणि 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.
याशिवाय या नव्या फोनमध्ये 3200 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.1 नॉगटवर आधारित आहे. याशिवाय यात 4जी, वाय-फाय, जीपीएस यासारखे अनेक कनेक्टिव्हिटीचे ऑप्शन देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement