OnePlus Smart TV : OnePlus Smart TV 17 फेब्रुवारीला चार मॉडेल्ससह होणार लॉंन्च, जाणून घ्या याचे भन्नाट फीचर्स
OnePlus New Launch : OnePlus ब्रँडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी 17 फेब्रुवारी रोजी आपल्या नवीन फोनसह OnePlus TV Y1S, Y1S Edge लाँच करणार आहे.
OnePlus Smart TV launch : भारताच्या स्मार्टफोन (SmartPhone) मार्केटमध्ये विशेष ठसा उमटवल्यानंतर आता OnePlus ला स्मार्ट टीव्ही क्षेत्रातही आपले स्थान निर्माण करायचे आहे. हे पाहता, कंपनी OnePlus TV Y1S, Y1S Edge येथे लॉन्च करण्याची तयारी करत आहे. अलीकडेच या टीव्हीचे फीचर्स आणि लॉन्चिंग डेटशी संबंधित माहिती लीक झाली आहे. या टीव्हीमध्ये कोणते फीचर्स मिळू शकतात आणि तो कधी लॉन्च होणार आहे ते जाणून घेऊ या.
2 मॉडेल ऑनलाईन आणि 2 ऑफलाईन उपलब्ध असतील
रिपोर्टनुसार, OnePlus हा TV OnePlus Nord CE 2 सोबत 17 फेब्रुवारी 2022 ला लॉन्च करू शकतो. या टीव्हीचे चार मॉडेल्स असतील. यापैकी, तुम्ही 32Y1S 32-इंच आणि 43Y1S 43-इंच ऑनलाइन खरेदी करू शकाल, तर इतर दोन मॉडेल्स, Edge 32Y1S आणि Edge 43Y1S, ऑफलाइन विकल्या जातील.
या टीव्हीची फीचर्स पाहा :
रिपोर्टनुसार, Y1S मालिकेतील लहान 32-इंच टीव्हीचा डिस्प्ले तुम्हाला HD रिझोल्यूशनमध्ये मिळेल, तर 43-इंचाच्या मॉडेलचा डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशनमध्ये असेल. त्याची रचना बेझल-फ्री असेल. हा स्मार्ट टीव्ही Android 11 वर चालणार असल्याची चर्चा आहे. या टीव्हीचा रिमोट अनोखा असणार आहे. कंपनीने ते वेगळ्या स्तरावरून तयार केले आहे.
जाणून घ्या किंमत :
लीक झालेल्या रिपोर्टनुसार, OnePlus TV Y1S 32-इंच मॉडेलची किंमत 20 हजार रुपयांपासून सुरू होते. त्याच्या 43 इंच मॉडेलची किंमत 25 हजार रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. कंपनीने किंमतीबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. यामध्ये, कमी किंवा जास्त बदल होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या :
- Realme C35 : स्टायलिश डिझाईन आणि भन्नाट फीचर्ससह Realme C35 लॉंच होण्यासाठी सज्ज
- Google-Airtel Deal : एअरटेल-गुगलच्या बिग डीलमुळे डिजिटल इंडियाला मिळणार भरारी, स्मार्टफोन होणार अधिक स्वस्त
- 5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha