एक्स्प्लोर

Google-Airtel Deal : एअरटेल-गुगलच्या बिग डीलमुळे डिजिटल इंडियाला मिळणार भरारी, स्मार्टफोन होणार अधिक स्वस्त

ग्लोबल टेक कंपनी गुगलने देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर भारती एयरटेल (Bharti Airtel) सह भागीदारी करण्याची घोषणा केली आहे

Airtel-Google Deal : देशात डिजीटल इकोसिस्टम ऐतिहासिक  संक्रमणातून जात आहे.  जगातील अनेक महत्त्वाच्या कंपन्या याचा लाभ घेऊ इच्छित आहे. या संधीचा फायदा घेत  ग्लोबल टेक कंपनी गुगलने देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर भारती एयरटेल (Bharti Airtel) सह भागीदारी करण्याची घोषणा केली आहे. या भागीदारी अंतर्गत गुगल भारती एअरटेलमध्ये एक अरब डॉलरची गुंतवणूक करणार आहे.  

एअरटेलची गूगलमध्ये गुंतवणूक 

भारतात परवडणारे स्मार्टफोन आणण्यासाठी आणि 5G सर्व्हिसेससंबंधित भागीदारी करण्यात येणार आहे. या भागीदारी अंतर्गत गूगल, भारतीय एअरटेलने 1 कोटी अरब डॉलर म्हणजे 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक  करणार आहे. गुगल ही गुंतवणूक गुगल फॉर इंडिया डिजिटाइजेशन फंडातून करणार आहे.  Google 700 मिलियन डॉलरची  (5,224.4 कोटी रुपये)  गुंतवणूक करून भारती एअरटेलमध्ये 1.28 टक्क्यांची भागीदारी खरेदी करणार आहे, भारती एअरटेलने स्पष्ट केले आहे की, गूगल भारती एअरटेलमध्ये 734 रुपये प्रति शेअर एवढ्या किंमतीती शेअर खरेदी करणार आहे. 

पाच वर्षाच्या मल्टी ईअर डील अंतर्गत गूगल  300 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. सध्या देशातील 1.3 बिलीयन नागरिकांपैकी 750 मिलियन नागरीकांपर्यंत इंटरनेटची सेवा मोबाईलच्या माध्यमातून पोहचली आहे. परंतु आजही 350 मिलीयन नागरिक फिचरफोन आणि बेसिक फोन वापरत आहे. स्मार्टफोन महाग असल्याने नागरिक ते फोन खरेदी करत नाही. एअरटेल 350 मिलिअन म्हणजे तब्बल  35 कोटी मोबाईल फोन स्वस्तात आणि परवडणाऱ्या किंमतीत नागरिकांना  देणार आहे. यामुळे फीचरफोन वापरणारे ग्राहक स्मार्टफोनशी जोडले जाणार आहे. इंटरनेट सर्फिंगसह अन्य डिजीटस सर्व्हिस उपलब्ध होणार आहे.

दोन स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्याशी भागीदारी करण्यात येणार असून वेगवेगळ्या किंमतीत स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करण्याची संधी शोधणाप आहे. गूगल एअरटलेसह 5G साठी भारतात विशिष्ठ डोमेन विकसीत करणार आहे. याशिवाय इतर छोट्या मोठ्या कंपन्यांना देखील सहभागी करून घेणार आहे. ज्यामुळे भारतात  क्लाउड इकोसिस्टम आणण्याच्या प्रक्रियेला वेग मिळणार आहे. 

भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल म्हणाले, एअरटेल आणि गूगल इनोव्हेटिव उत्पादनांच्या माध्यमातून भारतात डिजिटल डिविडेंड वाढवण्यावर भर देणार आहे. फ्युचर रेडी नेटवर्क आणि पेमेंट इकोसिस्टममुळे देशात डिजिटल इकोसिस्टमचा विस्तार करण्यासाठी गूगलसोबत काम करणार आहे. 

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले, दोन्ही कंपन्यांची कनेक्टिव्हिटीच्या विस्तार आणि जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत इंटरनेट पोहचवण्यासाठी आम्ही भागीदारी करत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. या भागीदारीचा मुख्य उद्देश नवे व्यापार मॉडेल तयार करणे, कनेक्टिव्हिटी वाढणे आणि कंपन्यांना त्याचे डिजीटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मदत करणार आहे.  गुगलला आपल्या सर्च इंजिनसाठी इंटरनेट यूजर्स पाहिजे. गूगलसह भागीदारी केल्यानंतर भारती एअरटेलला जो फंड मिळणार आहे त्यातून   5जी स्पेक्ट्रमसह  5जी नेटवर्क रोलआउट करण्यात मदत करणार आहे

भारती एअरटेल 5 जी सर्व्हिसेस लॉन्च करण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे, देशात अनेक ठिकाणी लाईव्ह डेमोस्ट्रेशन केले जात आहे,, लवकरच याचे कमर्शिअल रोलआऊट करण्यात येणार आहे. 5जी टेक्नोलॉजी टेस्टिंग दरम्यान 1जीबी  फाईल 30 सेकंदात डाऊनलोड करणे सहज शक्य होते. काही दिवसांपूर्वीच एअरटेलने नोकिया सोबत मिळून   कोलकाता शहराबाहेर   700 मेगा हर्टज स्पेक्ट्रम बँडमध्ये पहिली 5जी ट्रायल पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. भारतात ग्रामीण भागात केला जाणारी हा पहिली 5जी ट्रायल होती.  भारत एअरटेलने बिजनेस जगात एक नवी दिशा देण्यासाठी ग्लोबल टेक्नोलॉजी आणि मॅन्युफॅक्चीरिंग कंपन्याशी मिळून प्रयत्न करत आहे. तसेच Intel, Qualcomm, CISCO, Accenture, Ericsson कंपन्यासोबत मिळून देशाला हायपरकनेक्टेड वर्ल्ड श्रेणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. 

5जी च्या येण्याने मोबाईल टेलीफोनची दुनिया पूर्णपणे बदलणार आहे.  5जी आल्यानंतर व्यवसाय तसेच ऑटोमेशनला चालना मिळणार आहे. आतापर्यंत शहरापर्यंत मर्यादित असणारे गावापर्यंत पोहचणार आहे. ज्यामध्ये ई-मेडिसीनचा समावेश होणार आहे. तसेच शिक्षण, कृषी क्षेत्राला याचा फादा होणार आहे.  5G टेक्नोलॉजीमुळे हेल्थकेअर, वर्चुअल रियलिटी, क्लाउड गेमिंगला दिशा मिळणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM :  2 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha  Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 9 PM : 1 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaGopal Shetty : बोरिवलीतून लढण्यावर गोपाळ शेट्टी ठामKshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget