एक्स्प्लोर

OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro चे असे आहेत भन्नाट फीचर

चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी वनप्लसने मंगळवारी बंगळुरुच्या आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटरमध्ये दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. वनप्लस 7 प्रो आणि वनप्लस 7 अशी या दोन्ही फोन्सची नावे आहेत.

बंगळुरु : वनप्लसचे OnePlus 7 Pro आणि OnePlus 7 हे दोन नवीन फोन काल लाँच करण्यात आले. डिस्प्ले, बॅटरी आणि कॅमेराच्या बाबतीत उजवा असणारा OnePlus 7 Pro वनप्लसचा आतापर्यंतचा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. यावेळी कंपनीकडून लाँच करण्यात आलेल्या OnePlus 7 बाबतही लोकांमध्ये उत्सुकता आहे. या दोनही स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि दोन्ही मॉडेलमध्ये नेमका काय फरक आहे ते जाणून घेऊयात.

OnePlus 7 Pro

डिजाईन आणि डिस्प्ले या फोनमध्ये 6.67 इंचाचा QHD+Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. वनप्लस फोनमधील आतापर्यंतचा हा सर्वात चांगल्या दर्जाचा डिस्प्ले असल्याचं बोललं जात आहे. OnePlus 7 Pro चा डिस्प्ले अस्पेक्ट रेशो जास्त आहे. Pop Up Camera असल्याने या फोनच्या स्क्रीनवर notch नाहीये. तसेच या फोनला Curved Edges देण्यात आलेल्या आहेत. या फोनच्या मागच्या बाजूला 3 कॅमेरे देण्यात आलेले आहेत. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज OnePlus 7 pro मध्ये Qualcomm Snapdragon 855 हा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. Qualcomm चा हा सध्याचा सर्वात चांगला प्रोसेसर आहे. तसेच फोन वापरताना तो गरम होऊ नये याची देखील वनप्लसकडून यावेळी विशेष काळजी घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यासाठी या फोनमध्ये liquid cooling वापरण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. 6 GB, 8GB आणि 12GB रॅम आणि 128GB आणि 256 GB स्टोरेज या पर्यायांमध्ये OnePlus 7 Pro हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे. यामध्ये 12 GB रॅम असलेले मॉडेल हे 256 GB स्टोरेज क्षमतेमध्ये असणार आहे. कॅमेरा या फोनच्या मागच्या बाजूला 48 Megapixel, 16 Megapixel चे दोन कॅमेरे आणि 8 Megapixel ची टेलिफोटो लेन्स देण्यात आलेली आहे. तसेच समोरच्या बाजूला 16 Megapixel क्षमतेचा Pop Up Camera देखील देण्यात आलेला आहे. बॅटरी या फोनची बॅटरी 4000 mAH क्षमतेची आहे. तसेच 30W Wrap Charge मुळे हा फोन आणखी फास्ट चार्ज होणार आहे. केवळ 20 मिनिटांमध्ये 48 टक्क्यांपर्यंत हा फोन चार्ज होतो असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग देण्यात येईल असा अंदाज लावला जात होता. मात्र वनप्लस मोबाईलमध्ये यावेळीसुद्धा वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आलेला नाही. कलर Mirror Gray, Nebula Blue आणि Almond या तीन कलरमध्ये OnePlus 7 Pro मिळणार आहे. किंमत 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल : 48,999 रुपये 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल : 52,999 रुपये 12 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल : 57,999 रुपये

OnePlus 7

OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro या दोन्ही फोनच्या डिजाईनमध्ये बराच फरक दिसून येतो. OnePlus 7 हा फोन बऱ्यापैकी वनपल्स 6T सारखा दिसतो. OnePlus 6T प्रमाणे या फोनला देखील Display Notch आहे आणि विशेष म्हणजे वनप्लस 6 T इतक्याच किमतीमध्ये हा फोन मिळणार आहे. डिस्प्ले या फोनमध्ये 6.41इंचाचा fullHD रेसोल्युशन असलेला Optic AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज OnePlus 7 pro प्रमाणेच या फोनमध्येही Qualcomm Snapdragon 855 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. 6GB आणि 8GB रॅम या दोन पर्यायात हा फोन उपलब्ध असणार आहे. 12 GB रॅमचा पर्याय या फोनमध्ये कंपनीकडून देण्यात आलेला नाही. तसेच 128GB आणि 256GB स्टोरेजचे पर्याय यात देण्यात आलेले आहेत. कॅमेरा या फोनच्या मागील बाजूस 48 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आलेले आहेत.  तसेच समोरील बाजूस 16 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. बॅटरी या फोनमध्ये 3650 mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनला OnePlus 7 Pro मध्ये चार्जिंगसाठी असलेला Wrap Charge चा सपोर्ट देण्यात आलेला नाही. कलर हा फोन Mirror Gray आणि Red या दोन कलरमध्ये मिळणार आहे. यापैकी Red कलरमधील मॉडेल फक्त भारतात आणि चीनमध्ये उपलब्ध असणार आहे. किंमत 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल : 32,999 रुपये 8 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल : 37,999 रुपये संबंधित बातम्या OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro लॉन्च, किंमत फक्त...
OnePlus 7, OnePlus 7 Pro आज लॉन्च होणार; अंदाजित किंमत आणि फीचर
OnePlus 7 : प्री-बुकिंगला सुरुवात, 14 मे पूर्वी बुकिंग करणाऱ्यांना मिळणार 'ही' ऑफर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget