एक्स्प्लोर
WhatsAppचं यूजर्संना खास गिफ्ट!

मुंबई: व्हॉट्सअॅपनं आपलं 'स्टेटस' हे नवं फीचर लाँच केलं आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही आपल्या अॅक्टिव्हिटी व्हिडिओ आणि फोटो हे मित्रांसोबत शेअर करु शकता. स्टेटसमध्ये तुम्ही आतापर्यंत फक्त टेक्स्टचा वापर करु शकत होता. मात्र, आता या नव्या फीचरमुळे फोटो, व्हिडिओ आणि जीआयएफ यासारखे नवे ऑप्शन यामध्ये असणार आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये व्हॉट्सअॅपचे सीईओ आणि संस्थापक जैन कॉननं लिहलं आहे की, 24 फेब्रुवारीला व्हॉट्सअॅपच्या 8व्या बर्थडेला 'व्हॉट्सअॅप स्टेटस' हे फीचर आणणार आहे. कॉननं असंही लिहलं आहे की, 'दरवर्षी मी आणि ब्रेन या स्टेटस फीचरविषयी विचार करत होतो. तसंच याबाबत आणखी चांगलं काम कसं करता येईल यावरही विचार करत आहोत.' संबंधित बातम्या: व्हॉट्सअॅपचं नवं फीचर, आता फोटो, व्हिडीओ स्टेटस अपलोड करा!
Before You Go
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर






















