एक्स्प्लोर
Advertisement

अमेझॉनचा संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!
मायक्रोसॉफ्टचे बिल गिट्स यांना मागे टाकत अमेझॉनचा संस्थापक जेफ बेजोज हा देखील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.

मुंबई: जगातील सर्वात मोठी ऑनलाईन शॉपिंग कंपनीअमेझॉन इंकच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचसोबत कंपनीचा संस्थापक जेफ बेजोज हा देखील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला. त्याने मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांनाही मागे टाकलं आहे.
ब्लूमबर्ग बिलेनिअरच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी अॅमेझॉनच्या शेअरमध्ये 1.3 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे बेजोजची एकूण संपत्ती 90.9 अब्ज डॉलरवर जाऊन पोहचली. तर बिल गेट्स यांची एकूण संपत्ती 90.7 अब्ज डॉलर आहे. 2013 सालापासून बिल गेट्स हे अव्वल स्थानी कायम होते. म्हणजेच तब्बल 4 वर्षानंतर बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.
एका निष्कर्षानुसार, या त्रैमासिकात अॅमेझॉनची कमाई 37.2 अब्ज डॉलर होऊ शकते. ज्यामुळे मागील वर्षाच्या कमाईपेक्षा तब्बल 22 टक्के जास्त कमाई असणार आहे.
2017च्या सुरुवातीला बेजोज हे जगातीत चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. पण आता त्यांनी वॉरेन बफेट आणि अमौंसियो ऑर्टिगा यांनाही मागे टाकलं आहे.
जगातील टॉप 5 श्रीमंत व्यक्ती
1. जेफ बेजोज - 90.9 अब्ज डॉलर संपत्ती
2. बिल गेट्स - 90.7 अब्ज डॉलर संपत्ती
3. अमौंसियो ऑर्टिगा - 82.7 अब्ज डॉलर संपत्ती
4. वॉरेन बफेट - 74.5 अब्ज डॉलर संपत्ती
5. मार्क झुकरबर्ग - 70.5 अब्ज डॉलर संपत्ती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
