एक्स्प्लोर
निसान मायक्रा कारचं नवं व्हेरिएंट लाँच, किंमत 6.09 लाख
निसाननं देखील आपली प्रसिद्ध कार मायक्राचं फॅशन एडिशन लाँच केलं आहे. या कारची किंमत 6.09 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे.
मुंबई : सण आणि उत्सव यांचा मुहूर्त साधत अनेक कार कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय कारचे लिमिटेड एडिशन लाँच करणं सुरु केलं आहे. निसाननं देखील आपली प्रसिद्ध कार मायक्राचं फॅशन एडिशन लाँच केलं आहे. या कारची किंमत 6.09 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. या कारच्या डिझायनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
निसान मायक्रा फॅशन एडिशन कार ब्लॅक आणि ऑरेंज रंगात उपलब्ध आहे. फॅशन एडिशनमध्ये बॉडीवर नवे डिझाइन स्टिकर असून व्हील कव्हरवर ऑरेंज हायलाइटर देखील देण्यात आले आहेत. तर केबिन देखील ऑरेंज रंगातच आहे.
या कारमध्ये 6.2 इंच टचस्क्रिन सिस्टमही देण्यात आली आहे. ज्यामध्ये निसान कनेक्ट आणि फोनच्या मदतीनं रस्त्यांची माहिती देईल.
निसान मायक्रा फॅशन एडिशन फक्त पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 77 पीएस पॉवर आणि 104 एनएम टॉर्क देतं. यामध्ये 5 स्पीड सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. याचा कारचा अॅव्हरेज 19.34 प्रति लीटर आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement