एक्स्प्लोर
मोटोच्या नव्या स्मार्टफोनचं काही तासातच लाँचिंग
मुंबई: स्मार्टफोन कंपनी मोटोरोलानं लवकरच नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. 1 जूनला म्हणजे उद्याच नवा स्मार्टफोन लाँच होणार आहे. मोटोरोलानं याची माहिती एका ट्विटरवरुन दिली आहे. पण नेमका कोणता स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे याबाबत मोटोरोलानं कोणतीही माहिती दिलेली नाही. पण मोटो Z2 प्ले लाँच करु शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मोटो Z प्लसबाबत अनेक लीक रिपोर्ट समोर आले आहेत. हा मोटोरोलाच्या प्रीमियम Z सीरीजचा स्मार्टफोन आहे.
काही रिपोर्टनुसार, मोटो Z2 प्लस हा 7.1 नॉगट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. तसंच या स्मार्टफोन बराच स्लीम असेल. या स्मार्टफोनची बॅटरी 3000 mAh असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोटो Z2 प्ले मध्ये 5.5 इंच स्क्रीन आणि रेझ्युलेशन 1080 X 1920 पिक्सल असू शकतं. स्नॅपड्रॅगन 626 चिपसेट असण्याची असेल असा अंदाज आहे. यामध्ये 4 जीबी रॅम आणि 63 जीबी इंटरनल मेमरी असण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असेल असंही लीक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.Guess what?! We’re announcing the next bold phone from Motorola on June 1st. pic.twitter.com/SCyEkNtPza
— Motorola Canada (@Moto_CAN) May 30, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement