एक्स्प्लोर
बहुप्रतिक्षित 'मोटो झेड' 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च
![बहुप्रतिक्षित 'मोटो झेड' 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च Moto Z With Motomods India Launch Set For October 4 बहुप्रतिक्षित 'मोटो झेड' 4 ऑक्टोबरला होणार लॉन्च](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/26233723/moto-z-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोलाचा बहुप्रतिक्षीत मोटो झेड भारतीय बाजारपेठेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च करणार आहे. मोटोरोलाच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली.
मोटोरोलाचा मोटो झेड जून 2016 मध्येच जागतिक बाजारात आला आहे. या फोनसोबत मॉड्स नावाची एक्सेसरीजही देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मोबाईल वापरण्याचा अनुभव सुलभ होतो. या स्मार्टफोनची किंमत जवळपास 20 हजार रुपये असेल, तर मॉड्ससाठी ग्राहकांना 3,300 रुपये द्यावे लागतील.
"उत्सवांच्या काळात मोटोरोला 8 नवीन उत्पादनं भारतीय बाजारपेठेत उतरवणार आहे. त्यात मोटो झेडचाही समावेश आहे," असं लेनोवोचे भारताचे कार्यकारी संचालक सुधीन माथुर यांनी आज सांगितलं.
https://twitter.com/Moto_IND/status/780376458225078274
मोटो झेड सध्या अमेरिका, ब्रिटन आणि लॅटिन अमेरिकेत उपलब्ध आहे. यात मोटो झेड, मोटो झेड प्ले, आणि मोटो झेड फोर्स या मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. तसंच रिलायन्स जीओ ऑफरचा लाभही ग्राहकांना घेता येईल.
मोटो झेडचे फीचर्स :
रॅम : 2 जीबी
मेमरी : 16 जीबी इंटर्नल
प्रोसेसर : 1 गीगाहर्टझ क्वाड कोअर मीडियाटेक प्रोसेसर
डिस्प्ले : 5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले
बॅटरी : 3,500 mAh
कॅमेरा : रिअर 8 मेगापिक्सेल आणि फ्रंट 5 मेगापिक्सेल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
अकोला
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)