एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ड्यूएल कॅमेरा सेटअप, 2TB एक्स्पांडेबल मेमरी; Moto X4 भारतात लॉन्च
Moto X4 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. Moto X4 हा स्टर्लिंग ब्लू आणि सुपर ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध होईल.
नवी दिल्ली : मोटोरोलाने बहुप्रतिक्षीत मोटो X4 भारतात लॉन्च केला आहे. याआधी हा फोन आयएफए 2017 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता हा फोन भारतीय बाजारात सादर केला आहे.
एकेकाळी मोटो X4 हा कंपनीच्या फ्लॅगशिप सीरिजमधील फोन होता, जो काही काळासाठी बंद करण्यात आला होता. पण आता या स्मार्टफोनच्या लॉन्चमुळे या सीरिजचे चाहते फारच आंनदी असतील.
Moto X4 किंमत किती?
Moto X4 दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 3GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमेरी व्हेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. तर 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमेरी व्हेरिएंट 22,999 रुपयांत उपलब्ध होईल. हा फोन भारतात 13 नोव्हेंबरला रात्री 11.59 वाजता फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. तसंच मोटो हब शॉपमध्येही हा फोन ग्राहकांना मिळेल. Moto X4 हा स्टर्लिंग ब्लू आणि सुपर ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध होईल.
लॉन्च ऑफर काय?
लॉन्च ऑफरअंतर्गत 2,500 रुपयांची अतिरिक्त एक्स्चेंज ऑफर मिळेल, पण यासाठी तुम्हाला तुमचा फोन द्यावा लागेल. याशिवाय अपग्रेड ऑफरही आहे. या ऑफर अंतर्गत मोटोरोलाचे स्मार्टफोन एक्स्चेंज केल्यास 3,000 रुपयांची एक्स्ट्रा व्हॅल्यू मिळेल.
एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्ड युझर्सना यावर 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. यासोबतच 50 टक्क्यांची बायबॅक गॅरंटीही मिळेल. एअरटेल सिम युझर्सना 340GB एक्स्ट्रा डेटा दिला जाईल.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
Moto X4 मध्ये अँड्रॉईड 7.1 नोगट ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. यात कॉर्निंग ग्लास प्रोटेक्शनसह 5.2-इंच फूल एचडी (1080x1920 पिक्सेल) LTPS IPS डिस्प्ले देण्यात आली आहे. Moto X4 मध्ये 2.2 GHz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 630 ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. तर फास्ट चार्जिंगसाठी टर्बो पॉवरचा पर्यायही आहे. या फोनमध्ये 4GB रॅमसह 64GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. तसंच 2TB पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्टही आहे. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Adreno 508 GPU आहे.
Moto X4 मध्ये ड्यूएल कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. कॅमऱ्याच्या सेक्शनबाबत बोलायचं झाल्यास फोनच्या रिअरमध्ये f/2.0 अपार्चर असलेला एक 12 मेगापिक्सेलचा एक कॅमेरा आणि f/2.2 अपार्चरचा दुसरा 8 मेगापिक्सेलचा वाईड अँगल कॅमेरा आहे. तर या फोनच्या फ्रण्टमध्ये सेल्फीसाठी लिए f/2.0 अपार्चरसह 16 मेगापिक्सेल कॅमेरा दिला आहे. सेल्फी खास बनवण्यासाठी यात लो लाईट मोड, सेल्फी पॅनारोमा, फेस फिल्टर, ब्यूटीफिकेशन मोड आणि प्रोफेशनल मोड देण्यात आला आहे.
Moto X4 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3000mAh ची बॅटरीही दिली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, फोन केवळ 15 मिनिटं चार्ज केल्यास तो 6 तास वापरता येऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात एनएफसी, ब्लूटुथ, 5.0, वायफाय 802.11ac (ड्यूएल बँड, 2.4GHz आणि 5GHz), जीपीएस, GLONASS, 4G एलटीई आणि FM रेडिओ सपोर्ट आहे. लेटेस्ट ब्लूटुथ फीचरद्वारे हा स्मार्टफोन एकाच वेळा चार हेडफोन किंवा स्पीकरसोबत कनेक्ट केला जाऊ शकतो.
Moto X4 चे फीचर्स
- अँड्रॉईड 7.1 नोगट
- 5.2-इंच फूल एचडी (1080x1920 पिक्सेल) LTPS IPS डिस्प्ले
- 2.2 गिगाहर्त्झ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 630 ऑक्टाकोर प्रोसेसर
- 4GB रॅम
- 64GB इंटरनल मेमरीसह 2TB एक्स्पांडेबल मेमरी
- ड्यूएल कॅमेरा सेटअप, 12 आणि 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रण्ट कॅमेरा
- फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3000mAh ची बॅटरी
- एनएफसी, ब्लूटुथ 5.0, वायफाय 802.11ac, जीपीएस, 4G एलटीई आणि एफएम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement