एक्स्प्लोर
Advertisement
मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक करणं आवश्यक!
मुंबई: मार्च महिन्यात दूरसंचार मंत्रालयानं टेलिकॉम कंपन्यांना सर्व यूजर्सला आधारकार्डच्या साहाय्याने पुन्हा व्हेरिफाय करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांनी यूजर्सला मेसेज पाठवणंही सुरु केलं आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या यूजर्सला मेसेज पाठवून आधार नंबर लिंक करण्यास सांगितलं आहे. 'आपला नंबर चालू ठेवण्यासाठी आधारकार्डशी लिंक करा.' असे मेसेज कंपनीकडून पाठवण्यात येत आहेत.
जे नंबर व्हेरिफाय होणार नाहीत किंवा आधारशी लिंक होणार नाहीत ते नंबर 6 फेब्रुवारी 2018 पासून भारतात अवैध मानले जातील.
आपला मोबाइल नंबर आधारकार्डशी असा करा लिंक:
- हा मेसेज मिळताच आपल्या जवळच्या ऑपरेटर स्टोअरमध्ये जावं लागेल.
- तिथं तुमचं आधार कार्ड घेऊन जा. आणि त्यातील माहिती स्टोअरला द्या.
- त्यानंतर तुमच्याकडे व्हेरिफिकेशन येईल.
- हा व्हेरिफिकेशन नंबर कन्फर्म केल्यानंतर तुमचं फिंगर प्रिंट व्हेरिफिकेशन होईल.
- 24 तासात तुमचा नंबर आधारकार्डशी लिंक होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement