Mercedes-Benz : इलेक्ट्रिक कारचा सिंगल चार्जिंगमध्ये 1200 किमीचा प्रवास; मर्सिडिस बेन्झने स्वत:चाच विक्रम मोडला
Mercedes-Benz VISION EQXX : मर्सिडिस बेन्झच्या इलेक्ट्रिक कारचे या आधी सिंगल चार्जिंगमध्ये 1000 किमीचा प्रवास करण्याची क्षमता होती.
स्टुअर्टगार्ट: मर्सिडिस बेन्झने विकसित केलेल्या Mercedes-Benz VISION EQXX या इलेक्ट्रिक कारने (Electric Vehicle) स्वत:चाच विक्रम मोडला असून आता एकाच चार्जिंगमध्ये ही कार तब्बल 1200 किमीचा प्रवास करणार आहे. या कारने सिंगल चार्जिंगमध्ये जर्मनीतील स्टुअर्टगार्ट ते ब्रिटनमधील सिल्व्हरस्टोन असा 1202 किमीचा प्रवास केला आहे. हे अंतर कापण्यासाठी या कारला 14 तास आणि 30 मिनीटे लागली.
या आधी या कारने सिंगल चार्जिंमध्ये स्टुअर्टगार्ट ते कॅसिस असा 1008 किमीचा प्रवास केला होता. त्यामुळे मर्सिडिस बेन्झ कंपनीची ही सर्वात विश्वासार्ह इलेक्ट्रिक कार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे असं कंपनीच्या वतीनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. या कारचा मॅक्झिमम स्पीड हा 140 आहे.
मर्सिडिस बेन्झ कंपनीचे बोर्ड मेंबर असलेल्या मार्कस शॅफर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, "मर्सिडिस बेन्झ VISION EQXX सिंगल चार्जिंगमध्ये 1000 हून अधिक किमीचा प्रवास करु शकते हे आधीच स्पष्ट झालं आहे. आता त्याची क्षमता यापुढेही जाऊन ती 1200 किमीपर्यंत पोहोचली आहे. 2030 सालापर्यंत सर्व गाड्या या इलेक्ट्रिक असतील असं मर्सिडिस बेन्झ कंपनीचं ध्येय आहे. त्यामुळे कंपनी काय करु शकते हे जगाला दाखवणं अत्यावश्यक होतं."
भारतात इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन दिलं जात असून 2030 सालापर्यंत भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्या या इलेक्ट्रिक प्रकारातल्या असतील असं धोरण आखण्यात आलं आहे. त्याच हिशोबाने गाड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या धोरणात बदल केला असून ओला कंपनी त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणली आहे. सिंगल चार्जवर ही कार 500 किमी पर्यंत धावेल असा दावा कंपनीकडून केला जात आहे. तसेच ही कार अवघ्या चार सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडेल असा कंपनीचा दावा आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Electric Double Decker Bus : कशी आहे भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस?
- OLA Electric Car : स्वातंत्र्यदिनी Ola चा दुहेरी धमाका, सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 4 सेकंदात 100 किमीचा वेग गाठणार
- मुंबईहून दिल्लीला 12 तासात पोहोचता येईल, अशी क्षमता असणाऱ्या आरामदायी बसेसची निर्मिती करा - गडकरी