एक्स्प्लोर
Advertisement
लवकरच मर्सिडीजचा पिकअप ट्रक बाजारात!
मर्सिडीज-बेन्झने आपल्या पहिल्या पिकअप ट्रक ‘एस-क्लास’चे फोटो जारी केले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मर्सिडीजने पिकअप ट्रकची संकल्पना मांडली होती.
मुंबई : मर्सिडीज-बेन्झने आपल्या पहिल्या पिकअप ट्रक ‘एस-क्लास’चे फोटो जारी केले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मर्सिडीजने पिकअप ट्रकची संकल्पना मांडली होती.
पुढल्या वर्षी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील बाजारात एस-क्लास पिकअप ट्रक आणला जाणार असून, त्यानंतर दक्षिण अमेरिका, युरोप, अर्जेंटिना आणि ब्राझिलसह अनेक देशातील बाजारात हा ट्रक विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
मर्सिडीज एक्स-क्लास हा जगातील पहिला लग्झरी पिकअप ट्रक असेल. प्युअर, प्रोग्रेसिव्ह आणि पॉवर अशा तीन व्हेरिएंटमध्ये मर्सिडीजने या पिकअप ट्रकची विभागणी केली आहे. त्यात एक पेट्रोल आणि दोन डिझेल असे पर्याय असतील.
पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 2.0 लीटरचे 4 सिलेंडर इंजिन देण्यात येतील, तर 165 पीएस पॉवर आणि 237 एनएम टॉर्क देण्यात येईल.
पहिल्या डिझेल व्हेरिएंटमध्ये 2.3 लीटरचे 4 सिलेंडर इंजिन देण्यात येतील, हे इंजिन दोन पॉवर ट्युनिंगसोबत असतील. यामध्ये 163 पीएस पॉवर आणि 403 एनएम टॉर्क असेल. दुसऱ्या डिझेल व्हेरिएंटमध्ये 190 पीएस पॉवर आणि 450 एनएम टॉर्क असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement